राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:17 AM2022-07-20T08:17:37+5:302022-07-20T08:25:03+5:30

शिंदे-भाजपा युतीत अपक्ष आणि इतर घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना खुश ठेवण्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई यासारख्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपदाच्या यादीत काही नवीन नावे दिसतील. 

Maharashtra Cabinet Allocation: 5 Names To Watch Out For Ahead of Shinde-Fadnavis's Balancing Act | राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

googlenewsNext

मुंबई - राज्यात २ आठवड्यांच्या पॉलिटिकल ड्रामानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन १५ दिवसांहून अधिक दिवस गेले तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. आमदारांच्या अपात्रेबाबत याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्याचा निर्णय झाल्यानंतर कॅबिनेट विस्तार होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत १६४ मतांनी बहुमत ठराव जिंकला. यावेळी विरोधकांच्या बाजूने केवळ ९९ सदस्यांनी मतदान केले. आता मंत्रिमंडळ विस्ताराचं आव्हान नवीन सरकारपुढे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात भाजपाला २८ तर एकनाथ शिंदे गटाला १५ मंत्रिपदे मिळणार आहेत. भाजपाच्या २८ मध्ये उपमुख्यमंत्र्यासह २० कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असेल तर ८ राज्यमंत्रिपदे असतील. तर शिंदे गटात मुख्यमंत्र्यासह ११ कॅबिनेट मंत्रिपदे आणि ४ राज्यमंत्रिपदे असतील. फ्री प्रेस जनरलनं याबाबत वृत्त दिले आहे.

रिपोर्टनुसार, ११ जुलै रोजी मंत्रिपदांची यादी जाहीर होणार होती. परंतु त्यादिवशी आमदारांच्या अपात्रेबद्दल याचिकेवर सुनावणी होणार होती. त्यानंतर या यादीची घोषणा राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपानं धक्कातंत्र अवलंबलं. आता गृह, अर्थ, जलसंपदा खात्यासाठी भाजपाकडून दबाव वाढला आहे. त्याचसोबत शिंदे-भाजपा युतीत अपक्ष आणि इतर घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना खुश ठेवण्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई यासारख्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपदाच्या यादीत काही नवीन नावे दिसतील. 

मंत्रिमंडळ वाटपात समतोल साधण्यासाठी ५ जणांवर जबाबदारी?
 

चंद्रकांत पाटील : भाजप
राज्य भाजपचे प्रमुख आणि २०१४ च्या फडणवीस सरकारमधील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, चंद्रकांत पाटील हे फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मूळचे कोल्हापुरचे आणि पुण्याचे आमदार असलेले मंत्रिमंडळात जातीय समीकरणावर भाजपचे लक्ष असेल. पाटील यांना खरोखरच मंत्रिमंडळात स्थान मिळाले, तर त्यांना ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणानुसार महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागेल. 

संजय कुटे : भाजप
जळगावचे आमदार, कुटे हे फडणवीस यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, तसेच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार इत्यादी नेत्यांसह कुटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात मोलाची भूमिका बजावली होती, शिंदे आणि त्यांच्या आमदारांसोबत सुरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. रणनीती आणि पुढील व्यूहरचना तयार करणे हे काम त्यांनी केले. त्यानंतर ते बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला गेले. ते भाजपच्या कोट्यातील प्रमुख मंत्र्यांपैकी ते एक असण्याची शक्यता आहे.

हितेंद्र ठाकूर : बहुजन विकास आघाडी
पालघर जिल्ह्यातील वसई मतदारसंघातील आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे वसई, नालासोपारा आणि बोईसरमधून तीन आमदार आहेत. माजी काँग्रेस सदस्य, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. बविआने 2019 च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देण्याचे वचन दिले होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये बविआचे महत्त्व दिसून आले, जिथे अटीतटीची स्पर्धा असते तिथे प्रत्येक मताला महत्त्व असते. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याशी स्वतंत्र बंद दाराआड बैठका घेतल्या होत्या.

याशिवाय, वसई-विरार महानगरपालिका (VVMC) निवडणुका जवळ आल्या आहेत, जिथे बविआने गेल्या वेळी ११५ पैकी १०९ प्रभागात विजय मिळवला होता, हितेंद्र ठाकूर किंवा त्यांचा मुलगा क्षितीज यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने ते स्थानिक निवडणुकात त्यास मदत होईल असं बोललं जात आहे. 

रवी राणा
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले अपक्ष आमदार राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची धमकी दिल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली आणि आठवडाभरानंतर ते जामिनावर बाहेर आले. रवी राणा हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खासकरून गेल्या अडीच वर्षांत जोरदार टीका करत आहेत

रवी राणा यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून विजय मिळवला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला, परंतु मविआने राजकीय समीकरणे बदलल्यानंतर ते तटस्थ राहिले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने ते मंत्र्यांच्या यादीत असतील का हे पाहणं गरजेचे आहे. 

बच्चू कडू : प्रहार जनशक्ती पार्टी
माजी जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री, कडू हे राज्यातील २०१९ च्या राजकीय समीकरणात मविआला पाठिंबा देणारे पहिले होते. चार वेळा आमदार राहिलेले कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परिचित चेहरा आहेत आणि यापूर्वी राज्यमंत्री असल्याने ते अपक्षांच्या मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Web Title: Maharashtra Cabinet Allocation: 5 Names To Watch Out For Ahead of Shinde-Fadnavis's Balancing Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.