आरक्षण मागणीविरोधात मधुकरराव पिचड रस्त्यावर

By admin | Published: July 27, 2014 01:45 AM2014-07-27T01:45:25+5:302014-07-27T01:45:25+5:30

आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी नाशिकमध्ये मोर्चाचे नेतृत्व करीत रस्त्यावरच ठाण मांडले.

On the Madhukar Pichad road against reservation demand | आरक्षण मागणीविरोधात मधुकरराव पिचड रस्त्यावर

आरक्षण मागणीविरोधात मधुकरराव पिचड रस्त्यावर

Next
नाशिक : धनगर व तत्सम जातींचा आदिवासींमध्ये समावेश करण्यात थेट मंत्रिमंडळ बैठकीत विरोध करणारे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी नाशिकमध्ये मोर्चाचे नेतृत्व करीत रस्त्यावरच ठाण मांडले. जवळपास तासभर रस्त्यावर मंत्र्यांनीच ठिय्या दिल्यामुळे पोलीस व प्रशासन यंत्रणोची तारांबळ उडाली़ अखेर शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन मोर्चाची समाप्ती करण्यात आली. 
दुपारी 12 वाजता गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडविण्यात आला. त्या वेळी आदिवासी विकासमंत्री पिचड यांच्यासह आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने मेहेर चौकाकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला. (प्रतिनिधी)

 

Web Title: On the Madhukar Pichad road against reservation demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.