लेफ्टनंट कर्नल जाधव यांची प्रेयसीवर हल्ला करुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 12:25 PM2016-10-24T12:25:31+5:302016-10-24T12:43:50+5:30

प्रेयसीचे लग्न ठरल्याने निराश झालेल्या लष्करातील लेफ्टनंट कर्नलने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Lt. Col. Jadhav's brother attacked with suicide | लेफ्टनंट कर्नल जाधव यांची प्रेयसीवर हल्ला करुन आत्महत्या

लेफ्टनंट कर्नल जाधव यांची प्रेयसीवर हल्ला करुन आत्महत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 24 -  प्रेयसीचे लग्न ठरल्याने निराश झालेल्या लष्करातील लेफ्टनंट कर्नलने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या लष्करी अधिकाऱ्याने  आत्महत्या करण्यापूर्वी कनिष्ठ अधिकारी असलेल्या आपल्या प्रेयसीलाही जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी. जाधव (40) असे आत्महत्या करणाऱ्या लेफ्टनंट कर्नलचे नाव असून, ते मुळचे महाराष्ट्रातील आहेत. मथुरा येथील लष्करी रुग्णालयात नियुक्तीवर असलेले जाधव यांचे गेल्या दोन वर्षांपासून त्यांची सहाय्यक असलेल्या लष्करातील कनिष्ठ महिला अधिकाऱ्यासोबत प्रेमसंबंध सुरू होते.  मूळची देहराडून येथील असलेल्या या महिला अधिकाऱ्याने आपले लग्न ठरल्याचे सांगत नाते संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याने जाधव निराश झाले होते.   
या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दोघेही यमुनापूर येथे फिरायला गेले होते. श्री राधा राधा कॉलनी येथे पोहोचल्यावर जाधव यांनी आपण आत्महत्या करत असल्याचे आपली प्रेयसी असलेल्या या महिलेस  सांगितले. तसेच तिलाही आपल्यासोबत आत्महत्या करण्यास सांगितले. मात्र तिने आत्महत्या करण्यास नकार दिल्यावर जाधव यांनी तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिला अधिकाऱ्यास मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर जाधव यांनी स्वत:ला कारमध्ये कोंडून घेतले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.  अशी माहिती मथुरा शहरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुमार सिंग यांनी सांगितले.  ही घटना घडल्यानंतर सदर महिला अधिकाऱ्यानेच यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. 

Web Title: Lt. Col. Jadhav's brother attacked with suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.