अधिकाऱ्यांच्या बदल्या आताच का ?; धनंजय मुंडेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:05 PM2019-05-11T12:05:17+5:302019-05-11T12:07:13+5:30

सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमकी काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे..

lok sabha election 2019 Dhananjay Mundane on bjp | अधिकाऱ्यांच्या बदल्या आताच का ?; धनंजय मुंडेंचा सवाल

अधिकाऱ्यांच्या बदल्या आताच का ?; धनंजय मुंडेंचा सवाल

Next

मुंबई - मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. जनतेला उत्तर द्या असे म्हणत, बदल्यांवर मुंडेंनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही. असं, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमकी  काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई महागनगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहेत.

लोकसभा निवडणूक सुरु असल्याने सध्या आचारसंहित लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजॉय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारला आहे.


 

Web Title: lok sabha election 2019 Dhananjay Mundane on bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.