गुटखा वाहतूक केल्यास परवाना होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:41 AM2018-09-17T01:41:03+5:302018-09-17T07:04:53+5:30

एफडीएकडून विविध उपाययोजना; शासनाने कारवाई करण्याचा प्रस्ताव केला मान्य

The license will be canceled if Gutkha is transported | गुटखा वाहतूक केल्यास परवाना होणार रद्द

गुटखा वाहतूक केल्यास परवाना होणार रद्द

Next

- राहुल शिंदे 

पुणे : राज्यात गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. मात्र, अवैध वाहतूक करून हे पदार्थ पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी आणले जातात. परंतु, या पुढील काळात प्रतिबंधित पदार्थाची वाहतूक करणाऱ्या चालकाचा व वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणी येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतून कोट्यवधी रुपयांचा गुटखा पुणे शहर व परिसरात दाखल झाल्याचा घटना समोर आल्या आहेत. त्यातच पुणे शहरात अनेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनातर्फे ७५ ठिकाणी धाडी टाकून तपासणी करून १ कोटी १९ लाखांचा गुटखा जप्त केला. काही महिन्यांपूर्वी शिरूर, बारामतीसह येरवडा, निगडी, पिंपरी-चिंचवड परिसरात एफडीएकडून गुटख्यावर कारवाई केली. त्यामुळे केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री होत असल्याचे समोर आले आहे. केवळ ट्रक किंवा टेम्पोमधूनच नाही तर प्रवासी वाहतूक करणाºया बसमधूनही वाहतूक होत असल्याचे एफडीएच्या कारवाईत आढळून आले आहे. गुटखाबंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनासह एफडीएकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे गुटख्याची वाहतूक करणाºया वाहनाचा वाहतूक परवाना आणि चालकाचा परवाना दोन्ही रद्द करण्याची कारवाई करावी, याबाबत एफडीकडून शासनाकडे व परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. तसेच या प्रस्तावास मान्यता मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. शासनाने नुकताच हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित मालाची वाहतूक करणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची मोटर वाहनातून वाहतूक होत असल्याचे आढळल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करावे. तसेच मोटर वाहन कायद्या कलम १९ (१) (सी) अन्वये चालकास वाहन चालविण्यापासून प्रतिबंधित करण्याबाबत संबंधित अधिकाºयाला सूचित करावे, असे परिपत्रक अन्न व औषध प्रशासनिक विभागाकडून काढले आहे.

एफडीएशी संपर्क करा
प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करणारी वाहने राज्याच्या मोटर वाहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर किंवा इतर नियमित वाहन तपासणीच्या वेळी निदर्शनास आल्यास सीमा तपासणी अधिकाºयाकडून वाहनाच्या परवान्यावर कारवाईसाठी ताब्यात घेतले जाते. एफडीएच्या अधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधावा, असेही एफडीएच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

Web Title: The license will be canceled if Gutkha is transported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.