लातूर मतदारसंघ - भाजपा उमेदवार बदलणार? नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:14 AM2019-02-07T05:14:19+5:302019-02-07T05:14:37+5:30

लातूर लोकसभा राखीव मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे डॉ. सुनील गायकवाड अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते.

Latur Constituency - BJP candidate to change? Newcomers get a chance | लातूर मतदारसंघ - भाजपा उमेदवार बदलणार? नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल

लातूर मतदारसंघ - भाजपा उमेदवार बदलणार? नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल

googlenewsNext

- हणमंत गायकवाड

लातूर लोकसभा राखीव मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे डॉ. सुनील गायकवाड अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. तो काळ मोदी लाटेचा होता. गेल्या पाच वर्षांत देश आणि राज्याबरोबरच स्थानिक पातळीवर विरोधकांच्या हाताशी आलेले मुद्दे सत्तापक्षाला आव्हान निर्माण करणारे आहेत.

अशावेळी भाजपातील अंतर्गत गटबाजीतून उमेदवार बदलाची हाक दिली जात आहे. परंतु डॉ. सुनील गायकवाड यांचा जनसंवाद हा सौहार्दपूर्ण राहिला आहे. खासदार म्हणून त्यांनी पक्षात व जिल्ह्यात राजकीय उपद्रव केला नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे केवळ अंतर्गत विरोध म्हणून डॉ. गायकवाड यांना बदलताना विचार करावा लागणार आहे. मात्र बदलाचा आवाज बुलंद झाला तर सुधाकर श्रृंगारे यांचे नाव समोर आहे. पालकमंत्री, अहमदपूरचे आमदार, जिल्ह्यातील काही पदाधिकारी श्रृंगारेंच्या बाजूने असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे. डॉ. गायकवाड आणि श्रृंगारे यांच्याशिवाय तिसरे दमदार नाव उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचे आहे. ते स्वत: इच्छुक नसले तरी उमेदवार बदलायचाच असेल तर जागा निवडून आणण्यासाठी भालेराव हे नाव अनेकांच्या पसंतीचे आहे.

काँग्रेसकडे उमेदवारांची गर्दी आहे, परंतु पक्षश्रेष्ठी तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. मोदी लाटेच्या निवडणुकीत चांगली लढत देणारे दत्तात्रय बनसोडे यांचा पुन्हा प्रयोग करणे योग्य होईल की नवा चेहरा द्यावा, याचे चिंतन काँग्रेस श्रेष्ठी करीत आहेत.
नव्या चेहºयांमध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, भा. ई. नगराळे, प्रा. शिवाजी जवळगेकर, उदगीरच्या नगराध्यक्षा उषा कांबळे आणि डॉ. शिवाजी काळगे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच जयंत काथवटे यांच्यासह अनेकांचा उमेदवारीसाठी अर्ज आहे. लातूर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व प्रदीर्घ काळ माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले आहे.

दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वर्चस्व राहिलेले विधानसभा मतदारसंघ याच लोकसभेत येतात. शिवाय माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदार संघही लातूर लोकसभा क्षेत्रात आहे. एकंदर मतदार संघाची पार्श्वभूमी आणि सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पाहता माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख निवडणूक प्रचाराची सूत्रे हाती घेऊन भाजपाला कडवे आव्हान देतील. भाजपा व काँग्रेसचा उमेदवार कोणीही असो, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध आ. अमित देशमुख असा सामना होणार आहे.

तूर लोकसभा राखीव मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे डॉ. सुनील गायकवाड अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. तो काळ मोदी लाटेचा होता. गेल्या पाच वर्षांत देश आणि राज्याबरोबरच स्थानिक पातळीवर विरोधकांच्या हाताशी आलेले मुद्दे सत्तापक्षाला आव्हान निर्माण करणारे आहेत.

अशावेळी भाजपातील अंतर्गत गटबाजीतून उमेदवार बदलाची हाक दिली जात आहे. परंतु डॉ. सुनील गायकवाड यांचा जनसंवाद हा सौहार्दपूर्ण राहिला आहे. खासदार म्हणून त्यांनी पक्षात व जिल्ह्यात राजकीय उपद्रव केला नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे केवळ अंतर्गत विरोध म्हणून डॉ. गायकवाड यांना बदलताना विचार करावा लागणार आहे. मात्र बदलाचा आवाज बुलंद झाला तर सुधाकर श्रृंगारे यांचे नाव समोर आहे. पालकमंत्री, अहमदपूरचे आमदार, जिल्ह्यातील काही पदाधिकारी श्रृंगारेंच्या बाजूने असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे. डॉ. गायकवाड आणि श्रृंगारे यांच्याशिवाय तिसरे दमदार नाव उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचे आहे. ते स्वत: इच्छुक नसले तरी उमेदवार बदलायचाच असेल तर जागा निवडून आणण्यासाठी भालेराव हे नाव अनेकांच्या पसंतीचे आहे.

काँग्रेसकडे उमेदवारांची गर्दी आहे, परंतु पक्षश्रेष्ठी तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. मोदी लाटेच्या निवडणुकीत चांगली लढत देणारे दत्तात्रय बनसोडे यांचा पुन्हा प्रयोग करणे योग्य होईल की नवा चेहरा द्यावा, याचे चिंतन काँग्रेस श्रेष्ठी करीत आहेत.
नव्या चेहºयांमध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, भा. ई. नगराळे, प्रा. शिवाजी जवळगेकर, उदगीरच्या नगराध्यक्षा उषा कांबळे आणि डॉ. शिवाजी काळगे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच जयंत काथवटे यांच्यासह अनेकांचा उमेदवारीसाठी अर्ज आहे. लातूर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व प्रदीर्घ काळ माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले आहे.

दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वर्चस्व राहिलेले विधानसभा मतदारसंघ याच लोकसभेत येतात. शिवाय माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदार संघही लातूर लोकसभा क्षेत्रात आहे. एकंदर मतदार संघाची पार्श्वभूमी आणि सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पाहता माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख निवडणूक प्रचाराची सूत्रे हाती घेऊन भाजपाला कडवे आव्हान देतील. भाजपा व काँग्रेसचा उमेदवार कोणीही असो, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध आ. अमित देशमुख असा सामना होणार आहे.

सध्याची परिस्थिती

भाजपाकडून ज्या प्रबळ दावेदाराला तिकीट नाकारले जाईल, त्यांना शिवसेना उमेदवारी देईल, अशी चर्चा शिवसेनेत आहे. परिणामी, खासदारांचे तिकीट नाकारणे आव्हान ठरेल. मात्र युती झाली तर हा तिढा राहणार नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. तिथे सध्यातरी बंडखोरीची शक्यता दिसत नाही; परंतु आघाडीत बिघाडी झाली, तर राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे हे नाव समोर येईल.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गोटातला उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींकडून दिला जाणारा उमेदवार यात फरक झाला की भाजपाचे गणित बिघडणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाआघाडी न झाल्यास सामना तिरंगी होऊ शकतो.
 
Web Title: Latur Constituency - BJP candidate to change? Newcomers get a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.