कुलवेम गावठाणात ‘पाणीबाणी’, पाण्याविना नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 07:11 AM2018-05-10T07:11:32+5:302018-05-10T07:11:32+5:30

गोराई येथील कुलवेम गावठाणात कित्येक दिवसांपासून पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. येथील ५०हून अधिक घरांतील रहिवाशांना पाण्यासाठी केवळ एका टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेकडून या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यास मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आहे.

Kulveem village Water news | कुलवेम गावठाणात ‘पाणीबाणी’, पाण्याविना नागरिकांचे हाल

कुलवेम गावठाणात ‘पाणीबाणी’, पाण्याविना नागरिकांचे हाल

Next

- सागर नेवरेकर
मुंबई - गोराई येथील कुलवेम गावठाणात कित्येक दिवसांपासून पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. येथील ५०हून अधिक घरांतील रहिवाशांना पाण्यासाठी केवळ एका टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेकडून या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यास मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आहे.
कुलवेम गावात एक जुनी टाकी असून, तिथे सायंकाळी ५ वाजता पाणी भरण्यासाठी रहिवाशांची गर्दी होते. टाकीतून मिळणारे पाणी रहिवासी दैनंदिन कामासाठी वापरतात. गावातल्या रहिवाशांसह पाड्यातील रहिवासीही पाण्यासाठी गावातल्या टाकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे गावातील रहिवाशांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिणामी, रहिवाशांमध्ये पाण्यावरून वारंवार वाद होतात. महापालिका पाण्याचे बिल पाठविते. पाणीबिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावला जातो, परंतु रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल, याची तरतूद करण्याची आवश्यकता महापालिकेला वाटत नाही. त्यामुळे मुबलक पाणी मिळत नसतानाही आम्ही त्याचे बिल का भरावे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पाण्याची समस्या महापालिकेच्या सातत्याने निदर्शनात आणूनही याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षीही येथील पाण्याचा प्रश्न महापाल्ोिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘यंदाही पाण्याची टंचाई दिसत आहे. पाण्याची पाइप लाइन आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीच नाही. पाणी विकत घेऊन पाण्याच्या टाक्या भरल्या जातात, तसेच गावात काही विहिरी आहेत, परंतु विहिरीचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने इतर कामासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. महापालिका आयुक्तांना ई-मेलच्या माध्यमातून पाण्याची समस्या सांगण्यात आली आहे. यावर अद्याप आयुक्तांचे उत्तर आलेले नाही.’

पाण्याचा एक थेंबही नाही
जलवाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातून पाणीपुरवठा होत नाही. मुख्य जलवाहिनी रस्त्यावरून टाकण्यात आली आहे. रस्त्यावर जागोजागी रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू झाले आहेत. त्यामुळे जलवाहिनीतील पाणी यांना पुरविण्यात येत असावे, त्यामुळे गावातील रहिवाशांना पाणी मिळत नाही. कधी-कधी तर पाण्याचा एक थेंबही मिळत नाही.
- आॅलिव्हर राणा,
स्थानिक रहिवासी.

गावठाणात सर्वेक्षण सुरू
पाण्याच्या समस्येबाबत कुलवेम गावठाणात सर्वेक्षण सुरू आहे. कुठे पाणी कमी आहे, कुठे पाणी पोहोचत नाही, तसेच रहिवाशांच्या काय समस्या आहेत, ते जाणून घेण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरू आहे. पाण्याच्या स्रोताला धक्का लागला असून, पाण्याचा दाब कमी झाल्याची शक्यता आहे. पाण्याचा दाब किती आहे, याचा मापदंड काढून वरिष्ठापर्यंत सर्व माहिती पोहोचविली जाणार आहे. त्यानुसार, पाण्याचा दाब कसा वाढवता येईल, याचा निर्णय वरिष्ठ घेतील.
- सागर लाड, कनिष्ठ अभियंता, आर/मध्य विभाग, महापालिका.
पाणीचोरीचा आरोप
कुलवेम गाव, अप्पर कोळीवाडा, लोअर कोळीवाडा या ठिकाणी रहिवाशांना पाणीच मिळत नाही, परंतु रहिवाशांना पाण्याचे बिल भरपूर येते. जे काही थोड्या प्रमाणात पाणी मिळते, ते रहिवाशांना थोडे-थोडे वाटून घ्यावे लागते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होते. मनोरी येथे अनधिकृत लॉजिंग सुरू आहेत. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात चोरीला जाते. नगरसेवक असताना पाण्याचे काम हाती घेतले होते, परंतु हे काम अर्धवट केले गेले. पाण्याचा दाब हा खूप कमी आहे. पाण्याच्या समस्येवर आयुक्तांकडे बैठक घेतली जाईल.
- शिवानंद शेट्टी, माजी नगरसेवक.

लवकरच कामाचा ‘श्रीगणेशा’!

रस्त्याच्या कडेला राहणाºया रहिवाशांना पुरेसे पाणी मिळतेय का, हे आधी तपासले पाहिजे. गावातील रहिवाशांना पाणी मिळत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे दुसरी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करत आहोत. या कामाची निविदाही मंजूर झाली असून, काम सुरू करत असताना एका गावातून दुसºया गावात जलवाहिनी टाकावी लागेल. मात्र, पहिल्या गावातील लोकांनी या कामास विरोध केला होता. त्यामुळे त्यांची समजूत काढून नवीन जलवाहिनी टाकल्याशिवाय रहिवाशांना पुरेसे पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
- रमाकांत बिरादर, सहायक आयुक्त-आर/मध्य विभाग, महापालिका.

Web Title: Kulveem village Water news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.