कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:40 AM2018-01-05T05:40:00+5:302018-01-05T14:04:09+5:30

कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे.

Koregaon Bheema Dashal pre-planned, police report | कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल

कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल

googlenewsNext

- जमीर काझी
मुंबई  - कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिकाºयांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळेही दोन्ही समाजांमध्ये अधिक कटुता निर्माण झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. गुरुवारी त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.
कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला अभिवादनासाठी देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांवर दगडफेक करून वाहनांची मोडतोड करण्यात आली. या दंगलीचे गांभीर्य लक्षात घेऊन महासंचालक दर्जाच्या अधिका-यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यात राज्य गुप्तवार्ता विभागाच्याही वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश होता. या अधिका-यांनी घेतलेल्या माहितीत गेल्या काही वर्षांपासून १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादनासाठी येणाºयांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काहीशी नाराजी होती. कट्टरवादाचा पुरस्कार करणाºया एका गटाकडून त्याबाबत आणखी गैरसमज पसरविण्यात आले. अस्वच्छता पसरविणे, हुल्लडबाजीमुळे स्थानिक भागात सवर्ण समाजातील मुले, महिलांची सुरक्षितता धोक्यात येणे, अशी कारणमीमांसा या गटाकडून करण्यात येत होती.
यंदा विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने लाखोंच्या संख्येत येणाºयांना धडा शिकविलाच पाहिजे, असा प्रचार या गटाकडून भूमिगतरीत्या करण्यात येत होता. त्यासाठी १ जानेवारीला गावातील कोणतेही दुकान, स्टॉल उघडायचे नाही, येणाºयांना मदत होता कामा नये, यासाठी कट्टरवाद्यांनी व्यापारी व दुकानदारांना तशा सूचना दिल्या होत्या, असे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणात वाहने आणल्याने ती फोडण्याचे आधीच ठरविण्यात आले होते. २९ व ३० डिसेंबरला संंभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळाला अभिवादनासाठी आलेला जमाव गावातून बाहेर गेलाच नाही. १ जानेवारीसाठी ते गावातच विविध ठिकाणी गटागटाने थांबून होते.
आंबेडकर अनुयायांना विजयस्तंभावर जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला, त्याचवेळी या समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना थोपविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तथापि, त्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने तो आटोक्यात आणण्यात अपयश आल्याचे अहवालात नमूद केले आहे.

जिग्नेशच्या भाषणाचा परिणाम
गुजरातचा तरुण दलित नेता जिग्नेश मेवानी याने ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत नव्या पेशवाईविरुद्ध लढा पुकारण्याची घोषणा केली होती. त्यामुळे दलित समाज उत्साहित झाला तर कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यामुळे ही ठिणगी दंगलीला कारणीभूत ठरल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे मत आहे.

सुुवेझ हक यांची बदली?

१ जानेवारीला विजयस्तंभाच्या ठिकाणी जाण्यास दलितांना अटकाव करणाºया हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तेथे जाण्यास निर्बंध घालण्याची आवश्यकता होती. मात्र पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुढील अनर्थ घडल्याचे अधिकाºयांचे मत आहे.

या दंगलीचे पडसाद महाराष्टÑाच्या कानाकोपºयाबरोबरच परराज्यातही उमटत असल्याने त्यांची या ठिकाणाहून बदली केली जाण्याची शक्यता आहे.

जिग्नेश, उमरला भाषणबंदी
सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यामुळे चिथावणीखोर, दुही पसरविणाºया प्रत्येक व्यक्ती, संघटनेवर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, विद्यार्थी नेता उमर खलिद यांना भाषणाला परवानगी देण्यात येणार नाही.
- सतीश माथूर,
पोलीस महासंचालक

Web Title: Koregaon Bheema Dashal pre-planned, police report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.