कोकण पदवीधर निवडणूक : मुल्ला, मोरे यांच्यावर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:33 AM2018-06-16T06:33:24+5:302018-06-16T06:33:24+5:30

येत्या २५ जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पदवीधरांचे प्रतिनिधित्व करूपाहणारे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत...

 Konkan graduate election: Crime against Mullah, More | कोकण पदवीधर निवडणूक : मुल्ला, मोरे यांच्यावर गुन्हे

कोकण पदवीधर निवडणूक : मुल्ला, मोरे यांच्यावर गुन्हे

Next

ठाणे - येत्या २५ जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पदवीधरांचे प्रतिनिधित्व करूपाहणारे शिवसेना, भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत, तर राष्टÑवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल असून संजय मोरे यांच्यावरही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतु, भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यावर मात्र कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील शिवसेना, भाजपा आाणि राष्टÑवादीच्या तीन उमेदवारांमध्ये खरी लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या सर्वच उमेदवारांनी अलीकडेच आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राष्ट्रवादीचे मुल्ला यांच्यावर ठाणे शहरातील नौपाडा, ठाणेनगर, राबोडी, कासारवडवली आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात २० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वयेदेखील गुन्हा दाखल आहे. महानगर दंडाधिकारी माझगाव, महानगर दंडाधिकारी ठाणे आणि सत्र न्यायालय ठाणे येथे त्यांच्याविरोधात खटले सुरू आहेत. गुन्हेगारी कारस्थान रचणे, संपत्ती हडप करणे, फसवणूक करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटी कागदपत्रे तयार करून ती खरी भासवणे अशा भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे मुल्ला यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदला गेला आहे. मुल्ला यांनी बँक ठेवी, बंधपत्रे, शेअर्स व इतर यामध्ये सात कोटी ४५ लाख रु पयांची गुंतवणूक केली आहे. त्यांची आठ कोटी २४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. मुल्ला यांच्यावर ११ कोटींचे कर्ज आहे. मुल्ला यांनी आपण बांधकाम व्यावसायिक असून आपल्याकडे मर्सिडीजसह इतर महागड्या गाड्या असल्याचे जाहीर केले आहे. मुल्ला यांनी त्यांच्या नावे १६ कोटी ८९ लाख ३५ हजार आणि पत्नीच्या नावे सात कोटी ९८ लाख ९८९ रुपयांचे उत्पन्न असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
सेनेचे संजय मोरे यांच्यावरही नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात सार्वजनिक शांतताभंग करणे, लोकसेवकावर हल्ला करणे, अतिक्रमण करणे अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मोरे यांच्याकडे ७३ लाख रु पयांची जंगम, तर जवळपास एक कोटी ६४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर ५५ लाख रु पयांचे देणे आहे. आपला टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून पत्नी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करते, अशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली.

डावखरेंवर एकाही गुन्ह्याची नोंद नाही

भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात एकही गुन्हा नोंद नसून कोणत्याही न्यायालयात एकही खटला सुरू नसल्याची माहिती दिली आहे.
निरंजन यांनी ११ कोटी रुपयांची चल, तर सात कोटी ७९ लाख रु पयांची अचल संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्यावर जवळपास सात
कोटी ३७ लाख रु पयांचे कर्ज आहे. निरंजन यांनी उत्पन्नाचा स्रोत भाडे, व्याज, वेतन दाखवले असून त्यांची पत्नी व्यावसायिक असल्याचे नमूद केले आहे.

Web Title:  Konkan graduate election: Crime against Mullah, More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.