Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:54 AM2018-03-13T06:54:53+5:302018-03-13T06:54:53+5:30

गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

Kisan Long March: Jai Kisan !, all the demands of the Morocchecks are approved | Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

Next

मुंबई : गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आझाद मैदानात ‘जय किसान’च्या ना-यासह टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
महाराष्टÑ किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला हजारो शेतकºयांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला. मात्र मुंबईच्या जनजीवनात कुठेही अडथळा आला नाही. परीक्षेला जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून रात्रीतून हे मोर्चेकरी आझाद मैदानाकडे रवाना झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ विधानभवनात पोहोचले आणि तब्बल अडीच तास मुख्यमंत्री, काही मंत्री, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. मोर्चेकºयांच्या सर्व मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे लेखी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा माकपाचे आमदार जे.पी.गावित यांनी आझाद मैदानावर मोर्चेकºयांसमोर केली. मंत्री चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकºयांना चर्चेचा तपशील वाचून दाखवण्यात आला. शेतकºयांच्या परतीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली.१८० किमीच्या पायपिटीमुळे अनेक शेतकºयांचे पाय सोलून निघाले.
सोशल मीडियावरही याबद्दल प्रचंड
हळहळ व्यक्त होत होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे,
पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा आणि सुभाष देशमुख हे मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, किसान सभेचे सचिव कॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष किसन गुजर, माजी आमदार नरसय्या आडम, इंद्रजित गावित, इरफान शेख, उमेश देशमुख, सुनील चौधरी, सावळीरावम पवार आदी उपस्थित होते.
>या मागण्या केल्या मान्य
२००१-०८ दरम्यान वंचित शेतकºयांनाही कर्जमाफी कृषीबरोबरच मुदत कर्जालाही माफी केंद्राची वाट न पाहता बोंडअळी नुकसानभरपाई
जीर्ण रेशन कार्ड बदलून मिळणार संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे मानधन वाढणार महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही
वनजमिनीचे दावे सहा महिन्यांत काढणार निकाली

Web Title: Kisan Long March: Jai Kisan !, all the demands of the Morocchecks are approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.