भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या कमळावर स्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 06:50 PM2017-11-05T18:50:35+5:302017-11-05T18:50:42+5:30

‘बहुत हुई महंगाई अब की बार मोदी सरकार’ असे नारे देत भाजपने जनतेला भुलवले. देशात सत्ता मिळाल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखविले. मात्र, आता भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या क मळावर स्वार झाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली.

kahneyyakumar,sangmner,sabha,student,ledear, | भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या कमळावर स्वार

भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या कमळावर स्वार

Next
ठळक मुद्देकन्हैयाकुमारची टीका : ‘मन की बात’ म्हणजे एकतर्फी संवाद
गमनेर (जि. अहमदनगर) : ‘बहुत हुई महंगाई अब की बार मोदी सरकार’ असे नारे देत भाजपने जनतेला भुलवले. देशात सत्ता मिळाल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखविले. मात्र, आता भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या क मळावर स्वार झाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली. कॉम्रेड दत्ता देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर येथे रविवारी कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त कन्हैयाकुमार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. मिंलिद रानडे, कॉ. एम. व्ही. जोगळेकर उपस्थित होते. ‘जय भीम, लाल सलाम’ च्या घोषणा देत कन्हैयाकुमार यांनी भाषणास प्रारंभ केला. देशातील परिस्थितीवर केवळ मूठभर लोकं बोलतात. बोलणाºयांना बोलू दिलं जात नाही. अन्यथा त्यांची गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कर्नाटकातील विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारखी हत्या होते. आम जनता सहभागी नसलेला सवाल हा राष्टÑीय सवाल नसतो. मला एकतर्फी संवाद आवडत नाही. एकतर्फी केलेला संवाद नसतो, तो आदेश असतो,असे सांगत कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर टीका केली.

Web Title: kahneyyakumar,sangmner,sabha,student,ledear,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.