उल्हासनगरात रिक्षा चालकाने जॅमर पळविले, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 02:48 PM2018-01-20T14:48:27+5:302018-01-20T14:49:23+5:30

जॅमर पळवून नेणा-या रिक्षा चालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहाड परिसरात रिक्षामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने, वाहतूक पोलिसांने रिक्षाला जॅमर लावले होते.

Jumar was abducted by rickshaw driver in Ulhasanagar, FIR filed | उल्हासनगरात रिक्षा चालकाने जॅमर पळविले, गुन्हा दाखल

उल्हासनगरात रिक्षा चालकाने जॅमर पळविले, गुन्हा दाखल

Next

उल्हासनगर : जॅमर पळवून नेणा-या रिक्षा चालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहाड परिसरात रिक्षामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने, वाहतूक पोलिसांने रिक्षाला जॅमर लावले होते. उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरूंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. शहराची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलीस विभागाला ४० वार्डंन दिले. सार्वजनिक रस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणा-या वाहनावर विरोधात वाहतूक पोलीस आक्रमक झाली. वाहनावर धडक कारवाई करूनही शहरातील वाहतूक कोंडी जैसे थे आहे. कॅम्प नं-१ येथील सार्वजनिक रस्त्याला अडथळा निर्माण करणा-या, एका रिक्षाला वाहतूक पोलीस बाबासाहेब पोटे यांनी जॅमर बसविले होते.

रिक्षा चालकाने जॅमरसह रिक्षा घेवून गेला. वाहतूक पोलीस बाबासाहेब पोटे यांच्या ही घटना लक्षात आल्यावर, त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात रिक्षा नंबर एम एच-०५, एस ८८४१ च्या मालकावर गुन्हा दाखल केला. जॅमर पळविणा-या रिक्षा चालकाचा शोध पोलीस घेत असून जॅमर पळवण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सततच्या प्रकाराने वाहतूक पोलीस हैराण झाले. महापालिका सहाय्यक आयुक्त प्रबोधन मेवाळे यांच्या पथकानेही गुरवार व शुक्रवारी रेल्वे स्टेशनसह हिराघाट परिसरातील अतिक्रमण हटविले. यावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या असंख्य चार चाकी गाडीला पोलांनी जॅमर लावून दंडात्मक कारवाई केली.

Web Title: Jumar was abducted by rickshaw driver in Ulhasanagar, FIR filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा