जवाहर द्विपवर डिझेल टँकवर वीज पडली! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात

By अतुल कुलकर्णी | Published: October 6, 2017 07:03 PM2017-10-06T19:03:14+5:302017-10-06T21:30:26+5:30

भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँकना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे

Jawahar Deep electricity bill diesel! Large fire, consuming thousands of liters of diesel | जवाहर द्विपवर डिझेल टँकवर वीज पडली! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात

जवाहर द्विपवर डिझेल टँकवर वीज पडली! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात

Next

मुंबई - भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँकना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे. या बेटावर १५ ते २० टँक आहेत. त्यापैकी १२ नंबरच्या टँकला आग लागल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

समुद्रातून तेल काढून मोठ्या जहाजाद्वारे जवाहर द्विपवर आणली जातात. तेथे डिझेल साठवून ठेवले जाते. शुक्रवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला आणि त्याचवेळी तेथे वीज कोसळली. त्यामुळे स्पार्किंग होऊन डिझेल टँकला आग लागली. काही वेळातच ही आग भडकली. आता समुद्रात आग विझवण्यासाठी बंब कसे न्यायचे यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. भाऊच्या धक्क्यावर हजारो लोक जमले आहेत. लोक फोटो काढून घेत आहेत.

Web Title: Jawahar Deep electricity bill diesel! Large fire, consuming thousands of liters of diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.