आम्ही रस्त्यावर उतरलो तर अवघड जाईल; पंकजा मुंडेंचा मराठा-ओबीसी वादावर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 06:11 PM2023-11-08T18:11:59+5:302023-11-08T18:12:27+5:30

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली जाळपोळ व दगडफेक झालेल्या ठिकाणांची पाहणी

It will be difficult if we came on streets; Pankaja Munde's warning on Maratha-OBC reservation dispute | आम्ही रस्त्यावर उतरलो तर अवघड जाईल; पंकजा मुंडेंचा मराठा-ओबीसी वादावर इशारा

आम्ही रस्त्यावर उतरलो तर अवघड जाईल; पंकजा मुंडेंचा मराठा-ओबीसी वादावर इशारा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जाळपोळ, आमदारांची घरे जाळण्याचा प्रकार घडला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडलीय, याचा तीव्र निषेध करते, अशा शब्दांत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी निषेध व्यक्त केला आहे. 

जाळपोळ आणि हिंसाचार यासह अंतरवली सराटीमधील लाठी चार्जची उच्चस्तरीय चौकशी करावी. पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडला, अशी टीका पंकजा यांनी केली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देताना जन्माने मागास असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ओबीसी- मराठा वाद लावण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. आम्ही रस्त्यावर उतरलो तर अवघड होऊन जाईल. आम्ही देखील उपोषण करु, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये दगडफेक, जाळपोळीचे प्रकार घडले होते. यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ भाजप नेत्या पंकजा मुंडे या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी घटनाक्रम जाणून घेत पोलीस तपासाविषयी माहिती घेतली. बीड येथील भाजप कार्यालय, शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय, क्षिरसागर यांचे निवासस्थान, सोळंके यांचे निवासस्थान, सुभाष राऊत यांचे हॉटेल या ठिकाणांना पंकजा मुंडे यांनी भेटी दिल्या आहेत.

 

Web Title: It will be difficult if we came on streets; Pankaja Munde's warning on Maratha-OBC reservation dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.