हायपरलूप ‘स्विच चॅलेंज’ पद्धतीने राबवणे शक्य , प्राथमिक अहवाल देणार : किरण गित्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:14 AM2017-11-18T02:14:24+5:302017-11-18T02:14:56+5:30

राज्य शासनाने नुकतीच ‘स्विच चॅलेंज’ ही नवीन पॉलिसी मंजूर केली आहे. यामध्ये शासकीय विभाग स्विच चॅलेंज पद्धतीने एखादा प्रकल्प उभा करू शकते.

 It is possible to implement HyperLog 'Switch Challenge', the primary report will be given: Kiran Gite | हायपरलूप ‘स्विच चॅलेंज’ पद्धतीने राबवणे शक्य , प्राथमिक अहवाल देणार : किरण गित्ते

हायपरलूप ‘स्विच चॅलेंज’ पद्धतीने राबवणे शक्य , प्राथमिक अहवाल देणार : किरण गित्ते

Next

पुणे : राज्य शासनाने नुकतीच ‘स्विच चॅलेंज’ ही नवीन पॉलिसी मंजूर केली आहे. यामध्ये शासकीय विभाग स्विच चॅलेंज पद्धतीने एखादा प्रकल्प उभा करू शकते. यासाठी एखाद्या खासगी कंपनीने सर्व तयारी करून शासनाला प्रस्ताव दिल्यानंतर शासन त्याचे स्विच चॅलेंज जाहीर करते व अन्य कोणती कंपनी हा प्रकल्प करू शकते का याची तपासणी करते. त्यानंतर संबंधित शासकीय विभाग व खासगी कंपनी तो प्रकल्प उभा करतो. यामुळे हायपरलूप हा प्रकल्प देखील पीएमआरडीए याच पॉलिसीनुसार करू शकते, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेलिस येथील ‘हायपरलूप वन’ या कंपनीच्या वतीने पूर्वव्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलिटी स्टडी) करण्यात येणार आहे. यामध्ये हायपरलूप वाहतूक कोणत्या मार्गामध्ये होऊ शकते, किती अंतर असू शकते, प्रवाशी किती असतील, डोंगराळ भाग, येणाºया अडचणी आदी बाबत येत्या सहा आठवड्यांत सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती गित्ते यांनी दिली. हायपरलूप ही वाहतूक व्यवस्था मास मेट्रो अथवा अन्य कोणत्याही वाहतूकीपेक्षा कमी खर्चामध्ये होऊ शकते.

Web Title:  It is possible to implement HyperLog 'Switch Challenge', the primary report will be given: Kiran Gite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.