विकासासाठीचे 13 कोटी पडून

By admin | Published: August 6, 2014 12:32 AM2014-08-06T00:32:48+5:302014-08-06T00:32:48+5:30

राज्यात सर्वाधिक 24 आमदार असलेल्या ठाणो जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने सुमारे 48 कोटी 51 लाख 39 हजार रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

It is about 13 crore for development | विकासासाठीचे 13 कोटी पडून

विकासासाठीचे 13 कोटी पडून

Next
सुरेश लोखंडे - ठाणो
राज्यात सर्वाधिक 24  आमदार असलेल्या ठाणो जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने सुमारे  48 कोटी 51 लाख 39 हजार रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. परंतु, या 24 आमदारांना यातील केवळ 35 कोटी 49 लाख 47 हजार रूपयांचा निधीच या 24  मतदारसंघातील विकास कामांवर खर्च करता आला आहे. उर्वरित सुमारे 13 कोटी एक लाख 92 हजार रूपयांचा निधी आमदारांच्या नाकर्तेपणामुळे मार्च (2क्13-14) अखेरीस शासनाकडून पडून असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले आहे. 
आता हेच 13 कोटी दोन लाख रूपये आचारसंहिता लागू होण्याआधी खर्च करण्यासाठी धावपळ या आमदारांत सुरू आह़े
मतदार संघातील पायाभूत सुविधांसह आवश्यक त्या विकास कामांवर खर्च करण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपये निधी आमदारांना राज्य शासनाकडून वर्षाला मंजूर होतो. कामाच्या खर्चास (इस्टीमेट) अनुसरून हा निधी मंजूर केला जातो. यासाठी आमदारांना विकास कामे सुचवावी लागतात. यामध्ये लघू पाटबंधारे विभागाव्दारे सर्वाधिक 2क् लाख रूपये खर्चाचे काम आमदारांना करता येते. सर्वाधिक खर्चाच्या या कामानंतर मात्र बहुतांशी कामे कमी खर्चाचीच असतात. रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या पायाभूत सुविधेवर जास्तीत जास्त 15 लाख रूपये तर वॉटर कुलरसारख्या वस्तू खरेदीसाठी सुमारे 25 हजार रूपये निधी मंजूर करणो शक्य होते. शासनाने आर्थिक मर्यादा ठरवून दिल्याप्रमाणोच निधी मंजूर करावा  लागतो. मतदारसंघात पायाभूत विकास कामे करून घेण्यासाठी मार्च अखेर्पयत संबंधीत आमदारांना कामे सुचवावी लागतात. अन्यथा निधी राज्य शासनाकडे जमा होत असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी के. पी. वळवी यांनी सांगितले. 
सभामंडपांच्या कामांसह पदपथ, उद्यानातील आसन व्यवस्था, पाईप लाईन, रस्ते, पायवाटा,  उद्यानविकास, समाजमंदिर, गटार, शौचालये, स्मशानभूमी, शेड, बसस्थानक आदी पायाभूत सुविधांची कामे आमदारांना घेणो शक्य आहे. जिल्ह्यातील 24 आमदारांनी सुमारे 677 कामे सुचविली आहेत.  या कामांसाठी लागणारा सुमारे 48 कोटी 51 लाख 39 हजार रूपये खर्चाला शासनाने प्रशासनकीय मंजुरी दिली आहे. यापैकी  आमदारांनी सुचविलेल्या कामांसाठी 35 कोटी 49 लाख 47 हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात  आल्याचे आढळले.
जिल्ह्यात बेलापूर, पालघर, मुंब्रा-कळवा, ठाणो, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा,  मीरा-भाइर्ंदर, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी (पूर्व), विक्रमगड, भिवंडी (ग्रामीण), शहापूर, भिवंडी (पश्चिम), डहाणू, नालासोपारा, वसई, बोईसर, उल्हासनगर, ऐरोली, कल्याण (पूर्व), डोंबिवली, कल्याण (ग्रामीण),  कल्याण (पश्चिम) या मतदारसंघांचे आमदार कार्यरत आहेत. 
यामध्ये  बेलापूर मतदारसंघाचे आमदार पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री गणोश नाईक यांनी  सुचविलेल्या 46 कामांसाठी पाच कोटी 16 लाख रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. यापैकी त्यांनी सर्वाधिक चार कोटी 14 लाख 13 हजार रूपयांचा निधी खर्च केला आहे. सर्वात कमी खर्च भिवंडी (पूर्व) चे आमदार रूपेश म्हात्रे यांनी 35 कामे सुचविले आहेत. या कामांच्या खर्चाला एक कोटी 59 लाख 38 हजार रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली . पण  त्यांनी केवळ 76 लाख 43 हजार  हजार रूपयांचा निधी मतदारसंघात खर्च केल्याचे  आढळून आले आहे.  वैद्यकीय शिक्षण मंत्री दोन कोटी 53 लाखांपैकी 24 कामांवर एक कोटी 97 लाख रूपये खर्च केले आहेत़ तर राज्यमंत्री गावित यांनी दोन कोटी 1क् लाखांपैकी 28 कामांवर एक कोटी 4क् लाख रूपये खर्च केले. 
 
आमदारप्र. मान्यता वितरीत निधी कामे
निधी लाखांतलाखांत
गणोश नाईक516.क्क्414.1346
राजेंद्र गावित21क्.1914क्.4828
रुपेश म्हात्रे559.3876.4335
रविंद्र चव्हाण148.6799.4916
रमेश पाटील2क्3.97125.7124
गणपत गायकवाड185.7812क्.873क्
संदीप नाईक2क्क्.क्क्183.7716
कुमार आयलानी2क्4.81181.6226
विवेक पंडित172.17125.8735
अब्दुल रशिद 185.93111.7647
ता. मोमीन
क्षितिज ठाकूर186.54148.8122
 
आमदारप्र. मान्यता वितरीत निधी कामे
निधी लाखांतलाखांत
राजाराम ओझरे2क्5.69136.8122
दौलत दरोडा178.1512क्.6235
विष्णू सावरा195.24133.5136
चिंतामण वनगा2क्6.66139.6754
किसन कथोरे128.76111.6315
बालाजी किणीकर18क्.78147.6222
गिल्बर्ट मेंडोन्सा175.57114.782क्
प्रताप सरनाईक155.451क्4.563क्
एकनाथ शिंदे197.37136.732क्
राजन विचारे244.48165.क्829
जितेंद्र आव्हाड253.23197.1224

 

Web Title: It is about 13 crore for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.