कांद्याची आवक प्रचंड वाढली; एपीएमसी तुडुंब, शेतकरी अडचणीत, व्यापारीही त्रासले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:32 AM2018-12-27T06:32:57+5:302018-12-27T06:33:12+5:30

राज्यभर कांद्याचे दर प्रचंड घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये बुधवारी १४४२ टन आवक झाली. जुना कांदा २ ते ४ रुपये व नवीन ५ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

 Inundation of onions increased tremendously; APMC tumult, distress of farmers, and traders too distressed | कांद्याची आवक प्रचंड वाढली; एपीएमसी तुडुंब, शेतकरी अडचणीत, व्यापारीही त्रासले

कांद्याची आवक प्रचंड वाढली; एपीएमसी तुडुंब, शेतकरी अडचणीत, व्यापारीही त्रासले

Next

नवी मुंबई : राज्यभर कांद्याचे दर प्रचंड घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये बुधवारी १४४२ टन आवक झाली. जुना कांदा २ ते ४ रुपये व नवीन ५ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. राज्यातील अनेक मार्केटमध्ये १ रुपयापेक्षाही कमी दराने विक्री करावी लागत असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.
आवक वाढल्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये कांदा ठेवण्यासाठीही जागा मिळेनासी झाली आहे. सर्व गोडाऊन फुल्ल झाली असून लिलावगृहासह धक्क्यांवरही गोणी ठेवाव्या लागत आहेत. जुना कांदा जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत बाजारभाव कमीच राहतील असे मत व्यापारी व्यक्त करू लागले आहेत. मुंबईत चांगला भाव मिळेल या आशेने आलेल्या शेतकºयांना निराश होऊन परत जावे लागत आहे.
प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान देशभर कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असतो. दर चांगले मिळतील या आशेने शेतकरी उन्हाळी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवत असतात. परंतु यावर्षी दिवाळीपासूनच कांद्याचे दर घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये रोज ७०० ते ८०० टन कांद्याची आवश्यकता असते. परंतु काही दिवसांपासून १ हजार टनपेक्षा जास्त माल विक्रीसाठी येत आहे. बुधवारी तब्बल १४४२ टनची आवक झाली असून त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. होलसेल मार्केटमध्ये जुना कांदा २ ते ४ रुपयांना विकावा लागत आहे. पुणे, अहमदनगर, नाशिकवरून मुंबईमध्ये कांदा वाहतुकीसाठी आलेला व उत्पादनासाठी झालेला खर्चही विक्रीतून मिळेनासा झाला आहे.

कांदा सडू लागला

एक महिन्यापासून बाजार समितीमध्ये विक्री न झालेला कांदा सडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. लिलावगृहामध्ये रोज ५० ते १०० गोणी खराब झाल्यामुळे फेकून द्याव्या लागत आहेत. सडलेल्या कांद्यामुळे दुर्गंधी वाढू लागली आहे.

बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्यामुळे दर कमी होऊ लागले आहेत. जुना कांदा संपेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
- राजेंद्र शेळके, अध्यक्ष, कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ

Web Title:  Inundation of onions increased tremendously; APMC tumult, distress of farmers, and traders too distressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.