बड्या थकबाकीदारांची चौकशी करा, संजय सिंह यांचे सीबीआयला साकडे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:53 AM2018-05-06T05:53:04+5:302018-05-06T05:53:04+5:30

बँकांचे अवाढव्य कर्ज थकवून विदेशात पळून जाण्याचे प्रकार उद्योगपतींनी केल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. यात विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोकसी, ललित मोदी, कैलास अग्रवाल, नीलेश पारेख, किरण मेहता, बलराम गर्ग आणि इतरांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या ज्या उद्योगपतींनी बँकांचे कर्ज थकविले आहे त्यांची चौकशी करून त्यांना विदेशात पळून जाण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी सीबीआयकडे केली आहे.

 Inquire about bigger defaulters - Sanjay Singh | बड्या थकबाकीदारांची चौकशी करा, संजय सिंह यांचे सीबीआयला साकडे,

बड्या थकबाकीदारांची चौकशी करा, संजय सिंह यांचे सीबीआयला साकडे,

Next

 - सोपान पांढरीपांडे
नागपूर -  बँकांचे अवाढव्य कर्ज थकवून विदेशात पळून जाण्याचे प्रकार उद्योगपतींनी केल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. यात विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोकसी, ललित मोदी, कैलास अग्रवाल, नीलेश पारेख, किरण मेहता, बलराम गर्ग आणि इतरांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या ज्या उद्योगपतींनी बँकांचे कर्ज थकविले आहे त्यांची चौकशी करून त्यांना विदेशात पळून जाण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी सीबीआयकडे केली आहे.
खा. संजय सिंह हे संसदीय समिती (कोळसा व पोलाद) व कृषी मंत्रालयाच्या कृषी व कृषक कल्याण या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. सीबीआयला पाठविलेल्या पत्रात खा. सिंह यांनी देशातील १८ उद्योगपती व त्यांच्या उद्योग समूहांनी बँकांचे किती कर्ज थकविले आहे, त्याची यादीही सादर केली आहे. यामध्ये अनिल अंबानी (१.२५ लाख कोटी), अनिल अग्रवाल (१.०३ लाख कोटी), शशी व रवी रुईया बंधू (१.०१ लाख कोटी), गौतम अदानी (९६,०३१ कोटी), मनोज गौर (७५,१६३ कोटी) यांचा उल्लेख केला आहे. या सर्व थकबाकीदारांबाबत जवळपास सर्व माहिती उघड झाली असून आता त्यांची चौकशी करून त्यांना विदेशात जाण्यापासून परावृत्त करण्याचे काम सीबीआयने करावे, अशी मागणी खा. सिंह यांनी केली आहे.

हे आहेत बडे थकबाकीदार
क्र. समूह मालक कर्ज (रु.)
१. रिलायन्स एडीएजी ग्रुप अनिल अंबानी १.२५ लाख करोड
२. वेदांत समूह अनिल अग्रवाल १.०३ लाख करोड
३. एस्सार समूह रुईया बंधू १.०१ लाख करोड
४. अदानी समूह गौतम अदानी ९६,०३१ करोड
५. जेपी समूह मनोज गौर ७५,१६३ करोड
६. जेएसडब्ल्यू समूह सज्जन जिंदल ५८,१७१ करोड
७. जीएमआर समूह जी.एम. राव ४७,९७६ करोड
८. लॅन्को समूह एल. मधुसूदन राव ४७,१०२ करोड
९. व्हिडीओकॉन समूह वेणुगोपाल धूत ४५,४०५ करोड
१०. भूषण पॉवर अ‍ॅन्ड स्टील लि. ब्रिज भूषण सिंगल ३७,२४८ करोड
११. जीव्हीके समूह जीव्हीके रेड्डी ३३,९३३ करोड
१२. आलोक इंडस्ट्रीज सुरिंदरकुमार भोन २२,०७५ करोड
१३. अ‍ॅमटेक आॅटो लि. अरविंद धाम १४,०७४ करोड
१४. मॉनेज इस्पात अँड एनर्जी लि. संदीप जाजोदिया १२,११५ करोड
१५. इलेक्ट्रोस्टील लि. उमंग केजरीवाल १०,२७३ करोड
१६. ईरा इन्फा इंजि. लि. एच.एस. भराना १०,०६५ करोड
१७. एबीजी शिपयार्ड लि. ऋषी अग्रवाल ६,९५३ करोड
१८. ज्योती स्ट्रक्चर्स लि. सदाशिव डी. क्षीरसागर ५,१६५ करोड

Web Title:  Inquire about bigger defaulters - Sanjay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.