संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत, खडकवासलामधून अडीच हजार क्युसेक्स विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:17 AM2017-09-20T00:17:39+5:302017-09-20T00:21:54+5:30

पुणे शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत होता. यामुळे अनेक रस्ते जलमय झाले़ दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले़

Incessant rain caused by life-threatening disruption, 25 thousand cusecs from Khadakvasala | संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत, खडकवासलामधून अडीच हजार क्युसेक्स विसर्ग

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत, खडकवासलामधून अडीच हजार क्युसेक्स विसर्ग

Next

पुणे : पुणे शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत होता. यामुळे अनेक रस्ते जलमय झाले. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. खडकवासला, धनकवडी, कात्रज, सिंहगड रोड परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. शहरात सकाळी अकरानंतर पावसाची संततधार सुरू होती. सायंकाळी त्याचा जोर कमी झाला. पाऊस व वा-यामुळे मंगळवारी दिवसभरात १७ झाडपडीच्या घटना घडल्या़ कोंढव्यातील लुल्लानगर आणि शिवाजीनगर पोलीसलाइन येथे झाड पडल्याने मोटारी व दुचाकींचे नुकसान झाले़ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत ९ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झाली होती़ धरणात पावसाचे पाणी येण्याचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
कात्रज येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९़८ मिमी पाऊस पडला होता़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४़२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेले काही दिवस शहराच्या उपनगरात रात्री जोरदार पाऊस पडत आहे़ मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढू लागला होता.
विशेषत: सिंहगड रोड, खडकवासला, कोथरूड या परिसरात पावसाचा जोर जास्त होता. दुपारनंतर शहरातील पावसाची संततधार सुरू झाली़ मधूनच एखादी जोरदार सर येत होती़ त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, सिग्नल बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे दिसून येत आहे़ शहरात मंगळवारी दिवसभरात एकूण १७ झाडपडीच्या घटना घडल्या़ त्यातील अनेक झाडे ही रस्त्यावर पडल्याने त्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती़ बिबवेवाडी येथील गावठाण कमानीजवळ विजेच्या तारांवर झाडाची फांदी पडल्याने सकाळी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता़
>शिवतीर्थनगर, वारजे व हडपसर येथे मोटारीवर झाड पडल्याने नुकसान वारजे येथील श्वेतगंगा सोसायटी; तसेच कोरेगाव पार्कमधील लेन
डी येथे पार्क केलेल्या मोटारींवर झाड पडल्याने काही गाड्यांचे नुकसान झाले़ औंध येथील भाऊ पाटील रोड, हडपसर येथील ससाणेनगरमधील साधना बँक चौकात झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती़ कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीजवळ रस्त्यावर झाडाची फांदी पडली; तसेच पद्मावतीतील संगम सोसायटी, पौड रोडवरील शिवतीर्थनगर कमान येथे झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती़ याशिवाय वैकुंठ स्मशानभूमी, फुलवाला चौक, सहकारनगर फेज २ मधील सहानंद सोसायटी, सॅलिसबरी पार्कमधील जैन मंदिर येथे झाडपडीच्या घटना घडल्या़ अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील फांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली़

>जिल्ह्यातील ९ धरणांमधून विसर्ग सुरू
पुणे : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील २५ पैकी १६ धरणे शंभर टक्के भरली असून, इतर धरणेही जवळपास भरण्याच्या स्थितीमध्ये आली आहेत. त्यामुळे ९ धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत आहे़ खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक्स पाणी नदीत सोडले आहे़ उजनी धरण १०८ टक्के भरले असून, त्यातून ५ हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडले जात आहे़ खडकवासला साखळी धरणातील पानशेत, वरसगाव, खडकवासला ही तीनही धरणे १०० टक्के भरली आहेत़ पानशेत धरणातून पॉवर हाऊससाठी ६१० क्युसेक्स, वरसगावमधून ५८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. टेमघर धरणातून गळती होत असल्याने त्यात ५५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. दिवसभरात टेमघर धरण क्षेत्रात १८, वरसगाव ३२, पानशेत ३३ आणि खडकवासला धरण परिसरात १६ मिमी पाऊस झाला़ धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास आणखी पाणी सोडले जाणार आहे, असे खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील वडज, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, नीरा देवघर, भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे १०० टक्के भरली आहेत़ डिंभे धरणातून १७१०, कळमोडी ७८, भामा आसखेड ५५३, आंद्रा ५३, गुंजवणी ४७४, भाटघर १६६७, वीर १३ हजार ९११ आणि उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स पाणी सोडले जात आहे़ याशिवाय उजनी धरणातून उजवा कालवा १८००, बोगद्यातून ४०० आणि पॉवर हाऊससाठी १५०० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे़

Web Title: Incessant rain caused by life-threatening disruption, 25 thousand cusecs from Khadakvasala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.