सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:00 PM2023-11-03T12:00:37+5:302023-11-03T12:04:03+5:30

सुनिल तटकरे हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिकांवर सुनावण्या सुरु आहेत.

Immediate suspension of Sunil Tatkare; Supriya Sule's demand to Lok Sabha Speaker Om Birla After 3 months Ncp Clash | सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

राष्ट्रवादी पक्षफुटीचा राज्यात सुरु असलेला वाद आता लोकसभेतही पोहोचला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चार महिन्यांपूर्वी शरद पवारांनी राज्यसभेत केलेली असताना आता राष्ट्रवादीचे आणखी एक खासदार सुनिल तटकरे यांचे निलंबन करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे. 

सुनिल तटकरे हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिकांवर सुनावण्या सुरु आहेत. तसेच राज्यात विधानसभा अध्यक्षांकडेही दोन्ही गटांनी आपलाच गट खरा पक्ष असल्याचे दावे करत एकमेकांच्या गटातील आमदारांवर कारवाईची मागणी केलेली आहे. यावरही सुनावणी सुरु आहे. असे असताना दोन-तीन महिन्यांनी सुप्रिया सुळे यांनी खासदार असलेल्या तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली होती. तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्‍यासमोर दाखल करावी, असा प्रस्ताव सुळे यांनी शरद पवारांकडे मांडला होता. यानंतर आता सुळे या थेट लोकसभा अध्यक्षांकडे गेल्या आहेत. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी पत्र दिले असून तटकरे यांच्यावर राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार तत्काळ निलंबनाची कारवाई करवी, त्यांनी पक्ष विरोधी कृत्य केलेले आहे, अशी मागणी सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

Web Title: Immediate suspension of Sunil Tatkare; Supriya Sule's demand to Lok Sabha Speaker Om Birla After 3 months Ncp Clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.