रुग्णालयात थुंकाल तर...

By admin | Published: July 25, 2014 12:53 AM2014-07-25T00:53:04+5:302014-07-25T01:12:25+5:30

शासकीय रुग्णालयांमध्ये पान-खर्रा खाऊन थुंकणाऱ्या महाभागाची आता खैर नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धूम्रपान करणाऱ्यावर प्रतिबंध कलमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

If you spit in the hospital ... | रुग्णालयात थुंकाल तर...

रुग्णालयात थुंकाल तर...

Next

सार्वजनिक आरोग्य विभाग : प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
नागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये पान-खर्रा खाऊन थुंकणाऱ्या महाभागाची आता खैर नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धूम्रपान करणाऱ्यावर प्रतिबंध कलमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहे. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवाने दुष्परिणामांची सचित्र माहिती दर्शविणारे पोस्टर्स लावण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.
सध्या कोणत्याही शासकीय रुग्णालयात खर्रा, पान खाऊन भिंती रंगविणाऱ्या महाभागांची वानवा नाही. भिंतीचा कोपराच नाही तर आता खिडक्या, दारेही रंगलेले दिसतात. यामुळे सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे धडधाकट माणूसही आजारी पडण्याचा धोका वाढतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ११६ मध्ये तरतूद आहे. परंतु याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. यासंदर्भात नुकतेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी परिपत्रक काढून प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे. त्यांच्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर आणि थुंकण्यावर प्रतिबंध आहे आणि त्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे आणि धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. थुंंकण्यामुळे विद्रुप झालेल्या भिंती पुन्हा पुन्हा रंगविण्यासाठी जनतेने कररूपाने दिलेला पैसा खर्च होत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे पसरणारे विविध आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी विचारात घेता, प्रतिबंध अंमलबजावणी प्रभाविणे राबविणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य विभागाच्या कार्यालयांमध्ये थुंकण्यास व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास मनाई आहे, अशा आशयाचे फलक आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचनाही केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: If you spit in the hospital ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.