गोमांस जवळ असते तर एकही दहशतवादी वाचला नसता - उद्धव ठाकरे

By Admin | Published: July 11, 2017 09:57 PM2017-07-11T21:57:40+5:302017-07-11T21:57:40+5:30

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर

If the beef is near, then no one would have read the terrorist - Uddhav Thackeray | गोमांस जवळ असते तर एकही दहशतवादी वाचला नसता - उद्धव ठाकरे

गोमांस जवळ असते तर एकही दहशतवादी वाचला नसता - उद्धव ठाकरे

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 -  अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून  उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस असते तर त्या दहशतवाद्यांपैकी एकही दहशतवादी वाचला नसता. एरवी दिसणारे गौरक्षक आता कुठे गेलेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमरनाथ हल्ल्यावरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. "अमरनाथ यात्रेवर झालेला दहशतवादी हल्ला ही भयंकर घटना आहे. हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होणे हे केवळ भारतातच शक्य आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या तथाकथित गौरक्षकांवरही टीकास्त्र सोडले. जर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस आढळले असते तर त्यांच्यापैकी एकही दहशतवादी वाचला नसता. आता हे गौरक्षक कुठे गेलेत, असा सवाल त्यांनी केला.  
सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये महाराष्ट्रातील दोन भाविकांचा समावेश होता. 
अधिक वाचा  
काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य)
(अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला)
( अमरनाथ हल्ल्यावरून विरोधकांचे पंतप्रधानांवर टीकास्र )
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. 
 

Web Title: If the beef is near, then no one would have read the terrorist - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.