हर्ली डेव्हिडसनच्या बाईक्सला ‘सोलापूर टच’..

By Admin | Published: July 27, 2014 01:50 AM2014-07-27T01:50:28+5:302014-07-27T01:50:28+5:30

भारतातीलच नव्हेतर जगभरातील तरुणांच्या स्वप्नातील बाईक्स प्रत्यक्ष उतरविण्याचे मोठे काम सोलापूरचा एक तरुण अमेरिकेत बसून करतोय.

Hurley Davidson's Baix to 'Solapur Touch' | हर्ली डेव्हिडसनच्या बाईक्सला ‘सोलापूर टच’..

हर्ली डेव्हिडसनच्या बाईक्सला ‘सोलापूर टच’..

googlenewsNext
दीपक होमकर - सोलापूर
भारतातीलच नव्हेतर जगभरातील तरुणांच्या स्वप्नातील बाईक्स प्रत्यक्ष उतरविण्याचे मोठे काम सोलापूरचा एक तरुण अमेरिकेत बसून करतोय. मोटारसायकच्या विश्वात अग्रक्रमावर असणा:या हर्ली डेव्हिडसन या कंपनीमध्ये नव्या बाईक्सचे डिझाइन करणारा चेतन शेडजाळे असे या तरुणाचे नाव आहे. 
इतक्या मोठय़ा पदावर काम करतानाही चेतनमध्ये कुठलाही अहंभाव दिसत नाही! श्रविका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या मामाच्या ओळखीमुळे बंगळुरूमध्ये त्याला इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. तिथे त्याची ओळख मोटार डिझायनिंग क्षेत्रतील नागराज आणि प्रणोती या दाम्पत्याशी झाली. त्यांच्या प्रेरणोनेच या क्षेत्रत करिअर करण्याचे चेतनने पक्के केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने परदेशात जायचे ठरवले. मात्र घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्याने तुलनेने शिक्षणासाठी फार खर्च करावा लागणार नाही, या उद्देशाने जगभरातील सर्व विद्यापीठांचा इंटरनेटवर रात्रंदिवस शोध घेतला. त्यातून त्याला इटलीतील मिलान या जगविख्यात विद्यापीठातील एका आभ्यासक्रमाची माहिती मिळाली. वडिलांनी त्याला साथ देत पैसा उभा केला आणि 2क्क्3मध्ये चेतनने इटली गाठली. 
 तेथील अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याला फियाट या मोठय़ा कंपनीमध्ये इटर्नशिप करण्याची संधी मिळाली. त्याच कंपनीमध्ये मोटारसायकल आणि कार डिझाइन क्षेत्रतील भीष्मचार्य मानल्या जाणा:या  मासिमो तंबोरी यांची भेट झाली. चेतनचे कौशल्य पाहून त्यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये दरमहा 16 युरोवर (एक लाख रुपये) काम करण्याची संधी दिली. तेथूनच चेतनच्या ख:या करिअरला सुरुवात झाली. 
त्यांचं वर्कशॉप बंद झाल्यावर त्याने भारतातही काही कंपन्यांमध्ये प्रयत्न केले मात्र तिथे संधी मिळाली नाही. त्याने निराश न होता अमेरिका गाठली. त्या वेळी त्याला बीएमडब्ल्यूमध्ये प्रोजेक्ट मॅनेजरची संधी मिळाली. 2क्11ला हर्ली डेव्हिडसनसारख्या कंपनीने त्याला डिझाइन बनवून देण्याची ऑफर दिली. मात्र ती नोकरी नव्हती तर फक्त फ्री-लान्स डिझायनर व्हायचे होते. ही जोखीम पत्करत त्याने स्वत:ची कंपनी सुरू केली.
 या कंपनीद्वारे त्याने हर्ली डेव्हिडसनला अनेक डिझाइन्स बनवूनही दिल्या. त्याची ती चुणूक पाहून अखेर हर्ली डेव्हिडसनने त्याला कंपनीत सिनिअर इंडस्ट्रियल डिझायनर म्हणून नेमले. गेल्या वर्षभरात चेतनने डिझाइन केलेल्या तब्बल पाच मोटारसायकल बाजारात आल्या आहेत. अगदी नव्याने आलेली स्ट्रीट 75क् या गाडीचे रूपही चेतनच्या पेन्सील आणि लॅपटॉपमधूनच साकारले आहे.
गाडीचे डिझाइन बनवताना त्याच्या प्रत्येक पार्टच्या लांबी-रुंदीचे गणित ठरवावे लागते. मात्र जोर्पयत गाडी पूर्ण होत नाही तोर्पयत त्या डिझाइनचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो.
 
एका गाडीचे अंतिम डिझाइन बनविण्यासाठी त्याआधी शेकडो डिझाइन्स बनवावी लागतात. अनेकदा काही डिझाइन स्वत:लाच खूप भावतात, मात्र ती कंपनीला आवडली नाहीत तर एका क्षणात रिजेक्ट केली जातात. मात्र त्यामुळे न खचता कंपनीला अभिप्रेत असणारी डिझाइन तयार होईर्पयत मी झटत असतो आणि हाच गुण माङया यशाचे गमक आहे.
- चेतन शेडजाळे
 
च्सोलापुरातील बाळीवेसमध्ये राहणा:या आणि हरिभाईमध्ये शिक्षक असणा:या शेडजाळे  या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या चेतनची भरारी थक्क करणारी आहे.  
 
च्मोटारसायकल डिझायनिंगसारखे करिअर निवडणा:या चेतनने पॉवर बाईक निर्मितीक्षेत्रत जगात दबदबा असणा:या हर्ली डेव्हिडसन या कंपनीत सिनिअर इंडस्ट्रियल डिझायनर या पदार्पयत मजल मारली आहे.
 
च्कंपनीच्या कामानिमित्त जगभर दौरे करणारा चेतन दोन दिवसांपूर्वी भारतात आला आहे. मात्र इतक्या मोठय़ा पदावर काम करतानाही चेतनमध्ये कुठलाही अहंभाव दिसत नाही, हे विशेष!

 

Web Title: Hurley Davidson's Baix to 'Solapur Touch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.