बारावीचा निकाल जाहीर : उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची बाजी, तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:25 AM2019-05-28T11:25:14+5:302019-05-28T12:45:42+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता  जाहीर झाला.

HSC results is declare; 85.88% Students Passed | बारावीचा निकाल जाहीर : उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची बाजी, तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल

बारावीचा निकाल जाहीर : उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची बाजी, तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल

Next

 पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता  जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही  मुलींनी  निकालात बाजी मारली.यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला असून तो मागील वर्षापेक्षा 2.53 टक्क्यांनी घसरला आहे. याबाबत बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी माहिती दिली.

हा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.  बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडली.  सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मेच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाले, त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते.अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे.

यंदा राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.

यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. 
 राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर सर्वात कमी ३२ हजार ३६२ विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.

विभागवार निकाल खालीलप्रमाणे

पुणे विभाग :87.88 टक्के
नागपूर विभाग :82.51 
औरंगाबाद विभाग :87.29
मुंबई विभाग :83.85
कोल्हापूर विभाग :87.12
अमरावती विभाग :87.55
नाशिक विभाग :84.77
लातूर विभाग :86.06
कोकण विभाग:93.23

विविध शाखांचा निकाल 

विज्ञान शाखा निकाल :92.60टक्के

कला शाखा निकाल :76.45 टक्के

वाणिज्य शाखा निकाल :88.28टक्के

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम :78.93 टक्के

Web Title: HSC results is declare; 85.88% Students Passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.