दीरने भावजयीचा राहत्या घरात जाऊन आवळला गळा अन् स्वतही घेतला गळफास : गुढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:30 PM2017-08-24T13:30:41+5:302017-08-24T13:44:14+5:30

मेरी रासबिहारी लिंकरोडवरील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये प्रियासिंग विकासकुमार शर्मा (२७) यांची श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा (२५) यांनी गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 He lodged in a house of brother-in-law and went to the house and got himself arrested | दीरने भावजयीचा राहत्या घरात जाऊन आवळला गळा अन् स्वतही घेतला गळफास : गुढ कायम

दीरने भावजयीचा राहत्या घरात जाऊन आवळला गळा अन् स्वतही घेतला गळफास : गुढ कायम

Next
ठळक मुद्देआत्महत्त्या की हत्त्या यामागील गुढ कायममेरी व पंचवटी परिसर हादरून गेला प्रियासिंग यांच्या मृतदेहावरू न मात्र हत्त्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

नाशिक : येथील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये प्रियासिंग विकासकुमार शर्मा (२७) यांची श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा (२५) यांनी गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान श्रीरामकुमार यांनीही घरामधील छताच्या पंख्याला दोरी लावून गळफास घेत स्वत:ला संपविले आहे. श्रीरामकुमार यांची भावजयी असलेल्या प्रियासिंग यांचा मृतदेह जमीनिवर तर श्रीरामकुमार यांचा मृतदेह पंख्याच्या आधारे दोरीला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. यावरून पोलिसांनी असा अंदाज लावला आहे की, प्रथम श्रीरामकुमार यांनी भावजयीचा गळा आवळला व त्यानंतर स्वत: गळफास घेतला असावा, असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. भावजयीच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खूनाही पोलिसांना आढळून आल्या आहेत. या घटनेने संपुर्ण मेरी व पंचवटी परिसर हादरून गेला आहे. आत्महत्त्या की हत्त्या यामागील गुढ कायम असला तरी श्रीरामकुमार यांच्या मृतदेहावरून त्यांनी आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले; मात्र प्रियासिंग यांच्या मृतदेहावरू न मात्र हत्त्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रियासिंग ही पती विकासकुमारसोबत राहत होती. विकासकुमार हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदर घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, सकाळी सदर बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहे. अद्याप मयत प्रियासिंग यांच्या पतीने कुठलीही फिर्याद पोलिसांना दिलेली नाही.

Web Title:  He lodged in a house of brother-in-law and went to the house and got himself arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.