आषाढीसाठी एसटीचे पहिल्यांदाच ग्रुप बुकींग

By admin | Published: June 27, 2016 04:54 PM2016-06-27T16:54:42+5:302016-06-27T16:54:42+5:30

आषाढीवारी साठी पंढरपूरला जाणा-या भाविकांसाठी एसटीच्या पुणे विभागाकडून पहिल्यांदाच ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Group bookings for the first time in the ST for Ashadhi | आषाढीसाठी एसटीचे पहिल्यांदाच ग्रुप बुकींग

आषाढीसाठी एसटीचे पहिल्यांदाच ग्रुप बुकींग

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे,दि.२७ -  आषाढीवारी साठी पंढरपूरला जाणा-या भाविकांसाठी एसटीच्या पुणे विभागाकडून पहिल्यांदाच ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे विभागातील प्रमुख 13 डेपोंमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे डेपोच्या परिसरात येणारे भाविक एकत्र येऊन संपूर्ण गाडीच आरक्षित करू शकणार आहेत. या शिवाय, ही गाडी डेपो मधून जाता संबधित गावामधून पंढरपूरकडे सोडली जाणार असल्याची माहिती पुणे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली. विशेष म्हणजे या जादा गाडी कोणतेही जादा शुल्क आकारले जाणार नसून नियमित तिकिटांवरच हा प्रवास ग्रामस्थांना करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक स्थानकातील आगारात ग्रामस्थ आपली मागणी देऊ शकतात असेही मैंद यांनी स्पष्ट केले.
 संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या नंतर या वारी मध्ये सहभागी न होता आलेले अनेक भक्त आषाढी एकादशीला विठठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक मार्गस्थ होतात. त्यामुळे त्यांना पंढरपूरला जाण्यासाठीच्या गाडयांची कमतरता भासते. तसेच या भाविकांना मोठया शहरांमध्ये येऊन मग पंढरपूरकडे जावे लागते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गावा गावांधील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी गाडी मिळावी या उद्देशाने पुणे विभागाकडून यंदा पासून ग्रुप बुकिंगची सोय उपलब्ध  करून देण्यात आली असून येत्या 9 जुलै पासून या जादा गाडया सोडल्या जाणार आहेत.
असे करता येईल गुप बुकींग... 
ज्या गावातील 30 पेक्षा अधिक भाविक पंढरपूरला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही सुविधा असणार आहे. असे ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी एसटीच्या आपल्या परिसरातील आगाराकडे बसची मागणी करायची आहे. त्यानुसार, ग्रामस्थांनी प्रवासाची तारीख आणि वेळ एसटीकडे दिल्यानंतर तत्काळ गाडी बुक करून दिली जाणार आहे. या शिवाय या जादा गाडीसाठी कोणतेही जादा शुल्क असणार नाही. तर त्या गावा पासून पंढरपूर पर्यंत जे तिकिट असेल तेच तिकिट आकारले जाईल. त्यानुसार, ग्रामस्थांचा प्रवास डेपो मध्ये न येत प्रत्यक्षात गावामधूनच असेल ही सुविधा 9 ते 12 जुलै या कालावधीसाठी असेल. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Group bookings for the first time in the ST for Ashadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.