ग्रामपंचायत निवडणूक : राज्यमंत्री दादा भुसे यांना हादरा, मतदारसंघातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 09:25 AM2017-10-09T09:25:11+5:302017-10-09T14:46:41+5:30

राज्यातील 16 जिल्ह्यांमधल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या मतमोजणी सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे.

grampanchayat results today | ग्रामपंचायत निवडणूक : राज्यमंत्री दादा भुसे यांना हादरा, मतदारसंघातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपाकडे

ग्रामपंचायत निवडणूक : राज्यमंत्री दादा भुसे यांना हादरा, मतदारसंघातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपाकडे

googlenewsNext

मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यांमधल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या मतमोजणी सुरुवात झाली आहे.  विशेष म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे.  8 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. 

UPDATES :

अकोला 
बाळापूर तालुक्यातील कोळासा ग्रामपंचायत सरपंचपदी शेषराव वानखडे विजयी. भरतपूर ग्रामपंचायत सरपंचपदी श्रीकांत घोगरे विजयी.
अकोला शहरालगतच्या कुंभारी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बंडखोर जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजींचं वर्चस्व, ११ पैकी ९ जागांवर विजयी सरपंचपदी संतोष भटकर विजयी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचं वर्चस्व मोडीत

बाळापूर  
भरतपूर : श्रीकांत घोगरे
कोळासा : शेषराव वानखडे
मोर्धा : प्रविण पघरमोर
मोरझाडी : बाळक्रूष्ण फुकट
मनारखेड : सुरज पाटील
बारसिंगा : गजानन अवतीरक
सांगवी : महेंद्र सांगोकार
हसनापूर : सुनिल राऊत
कुपटा : राजेश नळकांडे
मोरगाव सादीजन : राजीव टेकाळे
कळंबी महालेश्वर : अंकूश ठाकरे
टाकळी खोजबोळ : सचिन टोळवे
टाकळी निमकर्दा : जयराम वानखडे
कळंबा बुद्रुक : प्रभा बागडे


लातूर
शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांना झटका, आशिव ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात, 20 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात.

बीड – पंकजा मुंडे यांना पुन्हा दणका, गोपीनाथ गड असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात

परळी   
बेलांबा- गित्ते इंदूबाई
चांदापूर -हनवते भागाबाई
गोवर्धन- जाधव भाग्यश्री
कौडगाव- साबळे ज्ञानोबा
दौडवाडी- दौड लिंबाजी
तळेगाव-  मुंडे शांताबाई
कौडगाव- हुडा गव्हाणे दत्तात्रय
गाढे पिपळगाव- सोनवणे वर्षा
मांडेखेल-मुंडे शिवबा ञिंबक
धर्मापुरी-फड अश्विनी गोंविद
पोहनेर-काकडे नितिन नरहरी
कन्हेरवाडी-फड राजाभाऊ
जिरेवाडी-कांदे गोवर्वधन धोंडिराम
लमाण तांडा-राठोड दत्ता सखाराम
नंदागौळ-गित्ते पल्लवी सुंदर
लोणी-देवकते विश्वनाथ
खो सावरगाव- दहिफळे वनमाला
पाडळी/हसनाबाद-हजारे शुभांगी भागवत
वाका- खोडके सुधामती साधु
तडोळी-सिरसाट कोंडाबाई राजाभाऊ
कौठळी-आदोडे नवनाथ

मालेगाव (नाशिक)- राज्यमंत्री दादा भुसे यांना हादरा,  दाभाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या चारूशिला निकम व सौंदाणे ग्रामपंचायत सरपंचपदी डॉ. मिलिंद पवार विजयी. 

धुळे : साक्री तालुक्यातील कुडाशी ग्रा.प.मध्ये सरपंचपदी आमदार डी. एस. अहिरे यांच्या पत्नी कुसुमबाई अहिरे विजयी.  रिना भोये यांचा पराभव केला.
धुळे : नगांव ग्रा.प.मध्ये सरपंचपदी माजी आमदार द. वा. पाटील यांच्या सून ज्ञानज्योती भदाणे विजयी. ज्ञानज्योती यांनी सासू सुशीलाबाई भदाणेंचा केला पराभव.

जळगाव : बोदवड निमखेड ग्रामपंचायतीच्या सर्व सात जागा भाजपाच्या हाती, बनुबाई रमेश सुरुंगे सरपंचपदी
यावल तालुका : कासारखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष भागवत शंकर पाटील  
चिखली बुद्रुकच्या सरपंचपदी कासाबाई कौटिक कोळी
चुनचाळेच्या सरपंचपदी  सुनंदा संजय पाटील यांची निवड
चितोळा ग्रामपंचायतीचे सरपंच सलीमा सलीम तडवी यांच्याकडे

अहमदनगर : तालुक्यात 28 पैकी 27 मतमोजणी पूर्ण, निवडणुकीत 27 सरपंच विजयी तर 260 सदस्य विजयी, एक ठिकाणी सरपंचाचा अर्ज बाद झाला आहे.

अहमदनगर तालुक्यात भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केशव बेरड यांचे पॅनलला धक्का. त्याचबरोबर भाजपा आमदार शिवाजी कर्डिले समर्थक मार्केट यार्डचे उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या पत्नी रेश्मा पराभूत झाल्या आहेत. 

जालना : घनसावंगी तालुका
पिरपगवाडी : सरपंचपदी शकुंतला पाटेकर (राष्ट्रवादी)
हातडी : सरपंचपदी राम शिंदे (राष्ट्रवादी)
दैठणा बु. : सरपंचपदी  रंजना धांडे (राष्ट्रवादी)
लिंबी : सरपंचपदी सुनील तौर (राष्ट्रवादी)
बोलगाव : सरपंचपदी  लक्ष्मण शेळके ( राष्ट्रवादी पुरस्कृत)
सिदेशवर पिंपळगाव : सरपंचपदी शोभा सातपुते  (शिवसेना) 
जालना एकूण 224 जागांची मतमोजणी

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे विजयी  सरपंच 

पाडळी:  बाबुराव गोपीनाथ वहाटुळे
चिंचोली: ज्ञानेश्वर दुधारे
पळसगाव: निमा पुनमसिंग राजपूत
दरेगाव: गणेश बोराडे
कानडगाव: स्वाती बाळासाहेब जाधव, (बिनविरोध)
येसगाव: सरूबाई बाबुराव खंडागळे
विरमगाव: सविता देवीदास आधाने
देवळाणा बु.: नसरीन रियाज पठाण
सुलीभंजन:  सय्यद इलियास सय्यद यूनूस
लोणी: सुलताना शकील पटेल

परभणी : सेलू तालूक्यातील 11 सरपंचपदाचे निकाल जाहीर

विजयी सरपंच 
कुपटा—अंकुश सोळंके ( ५५४ मतं)

शिंदे टाकळी—ज्ञानेश्वर पवार ( ६४५ मतं)

राधेधामणगाव —द्वारका गोरे ( ४४७ मतं)

मालेटाकळी—कल्पना ताठे (३३६ मतं)

 राव्हा—रमेश शिंदे ( ३८४ मतं)

गुगळी धामणगाव — शारदा महाजन ( ९६४ मतं)

म्हाळसापूर—कमलाकर अावटे ( ६२८ मतं)

 डिग्रस ( जहांगिर )—विद्या पौळ ( ७२० मतं)

 बोरकीनी/नरसापूर—शोभा ढाले ( ९५२ मतं)

रवळगाव—राधिका रोडगे ( ११९७ मतं)
डासाळा— नंदाबाई खराखे ( बिनविरोध )

नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यांमधील एकूण 3131 जागांसाठी मतदान घेण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात 18 जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होईल. तालुक्यातील रत्नापूर, राजुरी व शिवूर या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत मतदान झाले. तीनही ग्रामपंचायत मध्ये सरासरी ८४ टक्के मतदान झाले.

जामखेडमध्ये तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८४ टक्के मतदान 
अहमदनगर :  राजुरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी गणेश कोल्हे व सुभाष काळदाते यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. तर नऊ जागेसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. सरासरी ८४ टक्के शांततेत मतदान झाले. शिवूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ८५ टक्के मतदान झाले.
 
कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी मतदान?

जिल्हा               जागा

नाशिक             150
धुळे                    96
जळगाव           101
नंदुरबार            42
अहमदनगर     194
औरंगाबाद       196
बीड                 655
नांदेड              142
परभणी           126
जालना            221
लातूर              324
हिंगोली             46
अकोला          247
यवतमाळ         80
वाशिम           254
बुलडाणा        257

एकूण         3131

Web Title: grampanchayat results today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.