घाटकोपर दुर्घटना Update: ढिगा-याखाली अडकल्याने बारा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 12:49 PM2017-07-25T12:49:34+5:302017-07-25T21:17:30+5:30

इमारत कोसळण्याआधी आग लागून धुर आला व नंतर इमारत कोसळली अशी माहिती स्थानिक नागरीकांनी दिली.

Ghatkopar crash Update: Death of a woman due to stampede underground | घाटकोपर दुर्घटना Update: ढिगा-याखाली अडकल्याने बारा जणांचा मृत्यू

घाटकोपर दुर्घटना Update: ढिगा-याखाली अडकल्याने बारा जणांचा मृत्यू

Next

 - घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील दामोदर पार्क येथील साई दर्शन ही चार मजली इमारत सकाळी 10.45 च्या सुमारास कोसळली. 

- या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. 

 
- इमारतीच्या तळमजल्यावर सितप नर्सिंग होम हे रुग्णालय होते. तिथे काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
 
- आतापर्यंत  15 जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले असून, 30 ते 35 जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. 
 
- साई दर्शन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर तीन खोल्या होत्या.इमारत कोसळण्याआधी आग लागून धुर आला व नंतर इमारत कोसळली अशी माहिती स्थानिक नागरीकांनी दिली. 
 
- अग्निशमन दलाच्या 14 गाडया, दोन रेस्क्यु व्हॅन आणि 108 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. 
 
- या इमारत दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. एका मध्यमवयीन महिलेला ढिगा-याखालून बाहेर काढल्यानंतर राजावाडी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. 
 
- जखमींना जवळच्या राजावडी रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
- रुग्णालयात आणलेले रुग्ण जखमी अवस्थेत असले तरी, त्यांची स्थिती गंभीर नाही असे राजावडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. 
 
- पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्यी टीम्स घटनास्थळी असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे अशी माहिती झोन 7 चे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली. 
 
- खबदारीचा उपाय म्हणून आसपासच्या इमारतींमध्ये विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असून, परिसरातील सर्व रुग्णालयांना सज्ज रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
- आज दिवसअखेरीस राज्य सरकार यावर आपली भूमिका मांडणार आहे. 
 
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत या दुर्घटनेची सविस्तर माहिती देण्यास सांगितले. 
 
- संसदीय मंत्री गिरीश बापट दिवसअखेरीस या दुर्घटनेवर निवेदन देतील. 

Web Title: Ghatkopar crash Update: Death of a woman due to stampede underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.