वृक्षावर चित्रातून साकारले ‘गणेश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2016 01:46 PM2016-10-10T13:46:46+5:302016-10-10T13:46:46+5:30

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घडला. वृक्षावर चित्रातून साकारलेले गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

'Ganesha' presented through a picture on the tree | वृक्षावर चित्रातून साकारले ‘गणेश’

वृक्षावर चित्रातून साकारले ‘गणेश’

googlenewsNext
>शंकर वाघ, ऑनलाइन लोकमत
शिरपूर (वाशिम), दि. १०  - कलाकार काय करेल याचा नेम नाही. कशातही काहीना काही शोधत राहण्याचा कलाकारांचा एखादा छंद लक्षवेधी ठरु शकतो. तसाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घडला. वृक्षावर चित्रातून साकारलेले गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मालेगाव तालुक्यातील जगप्रसिध्द तथा जिैनाची काशी म्हणून प्रसिध्द असलेले शिरपूर जैन गाव. येथे सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून प्रसिध्द असलेले जानगिर महाराज संस्थान आहे. या मंदिर परिसरात पिंपळ व वडाचे एकमेकात गुंफलेले भव्य वृक्ष आहे. असेच दर्शनासाठी आलेले चित्रकार अमोल घोडे यांचे लक्ष या झाडाकडे वेधल्या गेले. त्यांना या वृक्षामध्ये गणेशांची प्रतिमा आढळून आल्याने त्यांनी आपल्या कल्पकतेने त्या वृक्षाला रंगवून श्री गणेश साकारले. त्यांच्या मदतीला शिवमंगल गौर यांनी रंग दिला. आज येथे येणारे भाविक या वृक्षाजवळ थांबून या दोन्ही चित्रकारांचे कौतूक करीत आहेत.
 

Web Title: 'Ganesha' presented through a picture on the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.