सरसंघचालकांच्या नावे केंद्रीय मंत्रालयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:10 AM2018-05-25T01:10:33+5:302018-05-25T04:44:08+5:30

डॉ. भागवत यांचा साहाय्यक असल्याची बतावणी : दिल्ली पोलिसात तक्रार

Fraud in the Union Ministry of Letters in the name of Sarsanghchalak | सरसंघचालकांच्या नावे केंद्रीय मंत्रालयात फसवणूक

सरसंघचालकांच्या नावे केंद्रीय मंत्रालयात फसवणूक

Next

यदु जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा सहाय्यक असल्याचे सांगून थेट केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह व त्यांच्या मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी या मंत्रालयाकडून दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूर कनेक्शनची चर्चा आहे.
अविचल नामक व्यक्तीने चौधरी वीरेंद्र सिंह यांचे खासगी सचिव सुधीर फोगाट यांना मोबाइल कॉल केला आणि तो स्वत: डॉ. मोहन भागवत यांचा सहाय्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे चौधरी वीरेंद्रसिंह स्वत: त्याच्याशी बोलले. शहानिशेनंतर अशी कुणी व्यक्ती सरसंघचालकांची सहाय्यक नाही व ज्या मोबाइलव नंबरवरुन कॉल आला होता तो नंबरही डॉ. भागवत यांच्या कार्यालयातील कुणाचाच नाही, असे संघाच्या दिल्ली कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
याच मंत्रालयात आणखी दुसरा प्रकार घडला. स्टील आॅथोरिटी आॅफ इंडियाचे (सेल) कार्यकारी संचालक अलोक सहाय यांनाही अविचलने कॉल केला. डॉ. भागवत यांच्याशी जवळीक आहे. सेलचे अध्यक्षपद ३१ जुलैला रिक्त होत असून या पदावर वर्णी लावण्यासाठी मी आपली मदत करू शकतो, असे त्याने सहाय यांना सांगितले. सहाय, फोगाट यांनी तक्रार केल्यानंतर चौधरी वीरेंद्र सिंह यांचे अन्य एक खासगी सचिव धीरज कुमार यांनी संपूर्ण घटनेची तक्रार दिल्ली गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडे (कमला मार्केट पोलीस स्टेशन) केली. तात्काळ चौकशी करावी, असे तक्रारीत म्हटले.

नागपूरचे ‘अविचल’ कनेक्शन
अविचल या व्यक्तीचे नागपूर कनेक्शन असल्याचे सांगितले जाते. अत्यंत प्रभावी केंद्रीय मंत्र्याच्या तो निकटवर्ती मानला जातो. हे मंत्री उत्तरप्रदेशातील आहेत. या मंत्र्यांकडे अविचलचा सतत वावर असतो. नागपुरातील भाजपच्या काही बड्या नेत्यांशी तो सलगी करुन असतो, अशी माहिती आहे.

Web Title: Fraud in the Union Ministry of Letters in the name of Sarsanghchalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.