शेतकरी कर्जमाफी : २९.५९ लाख कर्जमुक्त, १२,२०० कोटी खात्यात जमा  

By अतुल कुलकर्णी | Published: January 5, 2018 05:15 AM2018-01-05T05:15:47+5:302018-01-05T05:16:08+5:30

राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

 Farmer's debt waiver: 29.59 lakh loan-free, 12,200 crore deposits in the account | शेतकरी कर्जमाफी : २९.५९ लाख कर्जमुक्त, १२,२०० कोटी खात्यात जमा  

शेतकरी कर्जमाफी : २९.५९ लाख कर्जमुक्त, १२,२०० कोटी खात्यात जमा  

Next

मुंबई - राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ स्टेट बँक आॅफ इंडियाला झाला असून त्यांच्याकडील ४,१५,१७० खातेदारांचे कर्ज माफ झाले आहे. त्यापोटी बँकेला २५६३.२१ कोटी रुपये मिळाले आहेत.
३ जानेवारीपर्यंत ४७.८० लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यासाठी ४७.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सर्व जिल्हा बँकांमधील १८,६४,८४६ खातेदार शेतकºयांना ५८०० कोटी रुपये कर्जमाफी मिळाली आहे तर ७ राष्टÑीयीकृत बँकांच्या १०,९४,३३७ खातेधारक शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी या बँकांना ६४०० कोटी रुपये मिळाले आहेत.

आघाडी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ती अंमलात येण्यास २७ महिने लागले होते. त्यातही ती कर्जमाफी नेमकी कोणाला मिळाली याची माहिती ते सरकार ठेवू शकले नाही. आम्ही सात महिन्यात आॅनलाइन नोंदणी करून ३० लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली. सगळे रेकॉर्ड सर्वांसाठी उपलब्ध आहे. - सुभाष देशमुख, सहकारमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेनंतर सरकारला थोडीफार जाग आली. मात्र घोषणेची पूर्णत: अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे १६ जानेवारीपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु करणार आहोत.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस

Web Title:  Farmer's debt waiver: 29.59 lakh loan-free, 12,200 crore deposits in the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.