सरकारी कार्यक्रमांपासून जानकरांची फारकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 03:48 AM2016-05-30T03:48:55+5:302016-05-30T03:48:55+5:30

अहल्याबाई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी सोहळ्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाने फारकत घेतली आहे.

Failure to know from government programs | सरकारी कार्यक्रमांपासून जानकरांची फारकत

सरकारी कार्यक्रमांपासून जानकरांची फारकत

Next

गौरीशंकर घाळे,

मुंबई- अहल्याबाई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी सोहळ्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाने फारकत घेतली आहे. अहल्याबार्इंचे जन्मस्थान चौंडी येथे ३१ मे रोजी भव्य कार्यक्रमासाठी भाजपा सरकार गुंतले असताना मित्रपक्ष रासपने मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे देशातील सर्वात मोठा जन्मोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी जानकरांच्या रासपने चालविली आहे. याच कार्यक्रमातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा तीव्र करण्याची घोषणा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर अभ्यासासाठी वेळ मागितला होता. अशाप्रकारच्या अभ्यासासाठी दीड-दोन वर्षांचा काळ पुरेसा असतो. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे रासपने स्पष्ट केले आहे.
अलीकडच्या काळात धनगर आरक्षण आणि समाजाच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकांस महादेव जानकर अनुपस्थित होते. अलीकडेच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठान येथे बैठक घेतली. यास विविध पक्षांतील धनगर आमदार आणि नेते उपस्थित होते. या बैठकीस महादेव जानकर हजर नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक झाली. यात शास्त्रीय संशोधन पद्धतीने पारदर्शक अहवाल तयार करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या बैठकीसही जानकर अनुपस्थित होते.
आझाद मैदान येथील सोहळ्यास कर्नाटक, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आसाम, प.बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आदी. राज्यातून प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. याशिवाय शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते, रिपाइंचे खा. रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी, आ. विनायक मेटे आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
>राज्यातील सत्तेत वाटा मिळावा, ही छोट्या घटकपक्षांची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. गेली दीड वर्षे धनगर आरक्षण आणि मंत्रिपदाचे फक्त आश्वासन मिळत असल्याने रासपमध्ये नाराजी आहे. महादेव जानकर यांनी तर थेट पत्रकार परिषदेतच आपली नाराजी बोलून दाखविली होती.
आमदारकी मिळाल्यानंतर महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्याला बगल दिल्याचीही टीका झाली. त्यामुळे आझाद मैदान येथील कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा तीव्र केला जाणार आहे.

Web Title: Failure to know from government programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.