द्रुतगती महामार्गावर जड वाहनांना बंदी

By admin | Published: October 27, 2016 01:30 AM2016-10-27T01:30:16+5:302016-10-27T01:30:16+5:30

दिवाळीनिमित्त परगावी जाणाऱ्या प्रवासी व खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याने, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते.

Extreme heavy vehicles on the highway | द्रुतगती महामार्गावर जड वाहनांना बंदी

द्रुतगती महामार्गावर जड वाहनांना बंदी

Next

पुणे : दिवाळीनिमित्त परगावी जाणाऱ्या प्रवासी व खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याने, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी शुक्रवार ते सोमवारपर्यंत ठरावीक वेळेसाठी जड वाहनांवर बंदी घातली आहे.
ही बंदी शुक्रवार ते सोमवार अशी असणार आहे. ही बंदी शुक्रवार ते शनिवार मुंबई-पुणे लेन तर रविवार ते सोमवार पुणे-मुंबई लेनवर लागू असणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्री ९, शनिवारी सकाळी ८ ते दुपारपर्यंत, रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ८ आणि सोमवारी सकाळी साडेसहा ते ९.३० या कालावधीत ही बंदी असेल, असे महामार्ग पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Extreme heavy vehicles on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.