नक्षल-पोलीस चकमकीदरम्यान स्फोटके जप्त

By Admin | Published: September 29, 2014 12:23 AM2014-09-29T00:23:03+5:302014-09-29T00:23:03+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना अहेरी उपविभागातील पेरमिली उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत गट्टेपल्ली जंगल परिसरात

The explosives were seized during the Naxal-Police encounter | नक्षल-पोलीस चकमकीदरम्यान स्फोटके जप्त

नक्षल-पोलीस चकमकीदरम्यान स्फोटके जप्त

googlenewsNext

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना अहेरी उपविभागातील पेरमिली उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत गट्टेपल्ली जंगल परिसरात रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नक्षल-पोलीस चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटके, वायर बंडल, स्फोटके बनविण्यासाठी लागणारे साहित्य व नक्षल्यांचे इतर दैनंदिन साहित्य हस्तगत केले.
घातपाताच्या उद्देशाने गट्टेपल्ली जंगल परिसरात नक्षलवादी दबा धरून बसले होते. दरम्यान, पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. सदर जंगल परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी नक्षल साहित्य हस्तगत केले. पोलिसांच्यावतीने या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

Web Title: The explosives were seized during the Naxal-Police encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.