मोफत नेत्र शिबिरात आठ हजार रूग्णांची तपासणी

By Admin | Published: October 27, 2016 08:50 AM2016-10-27T08:50:20+5:302016-10-27T08:50:20+5:30

८ हजार गोरगरीब रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करत गरज पडल्यास शस्त्रक्रियेचाही खर्च करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे कौतुकास्पद काम येवल्यातील एका सेवाभावी संस्थेने केले आहे.

Examine eight thousand patients free eye camp | मोफत नेत्र शिबिरात आठ हजार रूग्णांची तपासणी

मोफत नेत्र शिबिरात आठ हजार रूग्णांची तपासणी

googlenewsNext

दत्ता महाले, ऑनलाइन लोकमत

येवला (नाशिक), दि. २७ -  सुमारे आठ हजार गोरगरीब रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करत गरज पडल्यास शस्त्रक्रियेचाही खर्च करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे कौतुकास्पद काम येवल्यातील एका सेवाभावी संस्थेने करत समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे.
येवला येथील डमाळे मित्र मंडळ, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई व एच. पी. देसाई आय केअर हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या अंतर्गत शस्त्रक्रिया शिबिरात ८ हजार रुग्णांच्या तपासण्या तर ३०० रुग्णांवर शस्त्रक्रिया पूर्ण होऊन अजून ३०० शस्त्रक्रिया पुणे येथे करण्यात येणार आहे. मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन टप्प्या टप्प्याने ४० गावात करण्यात आले होते. अजूनही ठिकठिकाणी हे शिबिर सुरू आहे. विशेष म्हणजे गावोगाव झालेल्या या शिबीराचा शुभारंभ स्थानिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता.
शिबिराचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात पार पडला. यामध्ये सुमारे ४,५०० तपासण्या तर २५० रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तसेच १० आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या शिबीराच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४ हजार तपासण्या होऊन सुमारे ४०० रुग्ण शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले आहे. यापैकी ४० रूग्णांच्या पुणे येथील एच. व्ही. देसाई आय केअर हॉस्पिटल येथे पहिला ग्रुपच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. या रूग्णांना बसने पुणे येथे रवाना करण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते बाबा डमाळे, झुंजार देशमुख, सुर्यभान जगताप, विनोद बागुल, डॉ. सुधाकर भागवत,संतोष घोडेराव, बाळासाहेब खांदेशी, अमोल सोनवणे, कुणाल धुमाळ, खंडू साताळकर, रावसाहेब मगर, भागीनाथ थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. उर्वरीत गरजू रु ग्णांवर दिवाळीनंतर शस्त्रिक्र या करण्यात येणार आहे. नेत्रिवकाराने ग्रासलेल्या रुग्णांचे मोठे प्रमाण असल्यामुळे ही सेवा वारंवार करण्याचा निर्धार डमाळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Examine eight thousand patients free eye camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.