मीटर नसतांनाही आली ३२ हजार भरण्याची नोटीस

By admin | Published: February 10, 2017 03:55 AM2017-02-10T03:55:17+5:302017-02-10T03:55:17+5:30

या तालुक्यात महावितरणचा गोंधळ सुरू असून मीटर नसतानाही एका ग्राहकाला ३२ हजाराचे थकीत बील आले आहे. २०० ग्राहकांना ते वीज वापरत

Even if there was no meter, there was a notice to fill 32 thousand rupees | मीटर नसतांनाही आली ३२ हजार भरण्याची नोटीस

मीटर नसतांनाही आली ३२ हजार भरण्याची नोटीस

Next

राहुल वाडेकर , विक्रमगड
या तालुक्यात महावितरणचा गोंधळ सुरू असून मीटर नसतानाही एका ग्राहकाला ३२ हजाराचे थकीत बील आले आहे. २०० ग्राहकांना ते वीज वापरत असतांनाही बीलेच येत नाही. तर अनेकांना रिडींग न घेताच अवास्तव रकमेची बीले पाठविणे असे प्रकार सुरु आहेत. याबाबत तक्रार केल्यास तिची कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ग्राहकांच्या तक्रांरी निवरण करण्यास येथे कर्मचारी अपुरे असून अनेकांच्या तक्रारींचे निवारण कित्येक महिनो न महिने होत नाही. तालुक्याचा विस्तार पाहाता येथे तीन सेक्शन कार्यालयांची गरज असतांना एकच कार्यालय असल्याने त्यावर मोठा ताण पडतो आहे़ यामुळे मुंबई येथे राहाणारे कपिलेश्वर जयविजय बोडके यांना त्यांचे आलोंडा येथे घर वा वीज कनेक्शन नसतांनाही त्यांना ३२,५४४ रुपयांचे थकीत वीज बील आले असून ते तातडीने भरण्याची नोटीसही बजावली गेली आहे. याबाबत त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
कपिलेश्वर यांचे मूळ गाव आलोंडा असून येथे त्यांचे वडील अधूनमधून येत असतात. वडीलांच्या नावे येथे घर आहे व त्याला मिटर असून ते ही वडीलांच्या नावे आहे़ त्याची सर्व बिले वडील व्यवस्थीत भरत आहेत़ मात्र कपिलेश्वरांचे येथे घर नसतांना व त्यांचे वास्तव्य मुंबई येथे असतांनाही त्यांच्या नावे नोटीस बजावून त्यांना जव्हार येथील लोकन्यायालयात हजर राहून हे थकीतबील भरण्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते सतंप्त झाले असूून याबाबत त्यांनी महावितरण कार्यायास नोटीस मागे घेण्यासंदर्भात पत्र दिले असून ते याबाबत ग्राहकमंचाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच रामू वनशा वरठा रा़ चिंचघर-पाचमाड यांना देखील आकरण्यांत आलेले बिल हे त्यांच्या मीटरचे नसून दुस-याच कुणाच्या तरी मीटरचे आले असल्याने त्यांनी देखील कार्यालयकडे तशी लेखी तक्रार केली आहे़ त्याचप्रमाणे कृष्णा धावजी महाले रा़ भानपूर-वांगणपाडा यांच्या मीटरचे रिडींग घेण्यास गेल्या सहा महिन्यापासून कुणीही येत नाही अथवा बिल देण्यासही कुणी येत नाही. त्यांना सरासरी युनिटप्रमाणे बिलाची आकारणी होत असल्याने त्यांना वापरापेक्षा जास्त बिल येत आहे़. त्यामुळे ते देखील त्रस्त झाले असून त्यांनीही तक्रार केली आहे़
जवळजवळ २०० हून अधिक ग्राहक असे आहेत. की त्यांना बिलच येत नाही़ त्यांच्या नावे मीटरच नाही. मीटर एकाचे त्याचे बील दुसऱ्याला असा गोंधळ सुरू आहे़ येथे अपुरे कर्मचारी आहेत़ तर उपलब्ध कर्मचा-यापैकी मोजकेच कर्मचारी कामाचे आहेत़ तालुक्याचा भार सांभळतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे़ मात्र ग्राहकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ मिटर नसतांना बिले आकारणे बंद करावे, तक्रारीचे योग्यवेळी निरसन व्हावे व रिक्त पदे भरावीत अशा विविध मागण्या ग्राहकांनी केल्या आहेत़

Web Title: Even if there was no meter, there was a notice to fill 32 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.