राज्यातील आयटीआयमध्ये १०० कोटींचे खरेदी घोटाळे, चौकशी समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:08 AM2017-11-30T06:08:25+5:302017-11-30T06:08:37+5:30

राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय), टेक्निकल हायस्कूल आणि अकरावी, बारावी व्होकेशनल ज्युनियर कॉलेजेसमध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची चौकशी

 Establishment of inquiry committee, 100 crore purchase scam in ITI in the state | राज्यातील आयटीआयमध्ये १०० कोटींचे खरेदी घोटाळे, चौकशी समितीची स्थापना

राज्यातील आयटीआयमध्ये १०० कोटींचे खरेदी घोटाळे, चौकशी समितीची स्थापना

googlenewsNext

- यदु जोशी
मुंबई : राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय), टेक्निकल हायस्कूल आणि अकरावी, बारावी व्होकेशनल ज्युनियर कॉलेजेसमध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
२०११ ते २०१४ या काळात झालेल्या खरेदीत तब्बल १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या तत्कालीन संचालकांनी दिलेला होता. त्यात संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी आणि शासनातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कंत्राटदार व अधिकाºयांच्या संगनमताने झालेल्या या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची शिफारसही संचालकांनी त्यांच्या अहवालात केली होती.
राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये लेथ मशीन आणि इतर प्रकारच्या साहित्याच्या खरेदीमध्ये हे घोटाळे झाले. आयटीआय, टेक्निकल हायस्कूल आणि अकरावी, बारावी व्होकेशनल ज्युनियर कॉलेजेस हे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येतात. आघाडी सरकारमध्ये हे संचालनालय उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येत होते. सध्या हे संचालनालय हे कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येते. याच विभागाने चौकशी समिती नेमली आहे. उद्योग संचालनालयाचे उपसंचालक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक हे चौकशी समितीचे सदस्य असतील. समिती दोन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करेल.
सूत्रांनी सांगितले की, चार वर्षांत झालेल्या खरेदीत मनमानीपणाचा कळस गाठण्यात आला. दर करारापेक्षा कितीतरी जादा दराने खरेदी करण्यात आली. निकृष्ट साहित्याची खरेदी करून अव्वाच्या सव्वा बिले कंत्राटदारांना अदा करण्यात आली. खरेदीसंदर्भात शासनाची मार्गदर्शक तत्त्वे गुंडाळून ठेवण्यात आली. विशिष्ट कंत्राटदारांनाच कंत्राटे दिली जात होती आणि त्यांच्याशी वरिष्ठ अधिकाºयांचे लागेबांधे होते. तत्कालीन संचालकांच्या अहवालात या घोटाळ्याबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

वादग्रस्त अधिकाºयाकडे होता कार्यभार

आयटीआय, टेक्निकल हायस्कूल आणि अकरावी, बारावी व्होकेशनल ज्युनियर कॉलेजेस हे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येतात. त्यातील खरेदीतच कोट्यवधींचे घोटाळे झाले. आघाडी सरकारमध्ये हे संचालनालय उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येत होते.
धक्कादायक माहिती अशी आहे की, सध्या अत्यंत वादग्रस्त असलेल्या आणि चौफेर टीकेचे लक्ष्य बनलेल्या एका आयएएस अधिकाºयाकडेच या घोटाळ्यांच्या काळात बºयाच कालावधीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

Web Title:  Establishment of inquiry committee, 100 crore purchase scam in ITI in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.