आणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:06 AM2018-06-14T06:06:28+5:302018-06-14T06:06:28+5:30

हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Elgher's leaders are arrested for the Emergency, Prakash Ambedkar | आणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

आणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Next

मुंबई : हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एल्गार परिषदेच्या नेत्यांना होणाऱ्या अटकेसंदर्भात खुलासा करण्यासाठी आंबेडकर यांनी पक्ष कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात सरकारकडून देशात दंगली घडवून अराजकता माजवत आणीबाणी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंबेडकर म्हणाले की, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक केली जात आहे. मुळात एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे कारण देत क्लीन चिट देणाºया सरकारने एल्गार परिषदेच्या नेत्यांविरोधात कोणते पुरावे मिळाले, ते सादर करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगलीशी काय संबंध आहे? त्याचा खुलासाही सरकारने करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
मुळात देशभरातील पोटनिवडणुकांसह विधानसभेच्या काही निवडणुकांत सरकारविरोधात जनमत जात असल्याचे दिसत आहे. म्हणूनच निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारकडून सातत्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्यात अपयश आल्याने आता सरकार आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत दंगली घडवू पाहत आहे. जेणेकरून देशात अराजकता माजून आणीबाणी घोषित करता येईल. एकदा आणीबाणी घोषित झाली की निवडणुका मे महिन्यापर्यंत पुढे ढकलता येतील, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.
एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगल किंवा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही. मात्र तपास यंत्रणांनी कोणत्याही पुराव्यांअभावी तथाकथित पत्रांचा संदर्भ माओवाद्यांशी जोडला आहे. मुळात एल्गार परिषदेच्या नेत्यांकडून जमा केलेल्या लॅपटॉपमधील डाटाही माओवादी किंवा नक्षलवाद्यांकडून आल्याचा पुरावा तपास यंत्रणांकडे नाही. तरीही परिषदेच्या नेत्यांना अडकवण्याचा डाव तपास यंत्रणांनी आखल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

भिडे यांना नोटीस बजावणार
नाशिक : आंबे खाल्ल्याने मूल होण्याचा दावा करणाºया शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना महापालिकेच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. नाशिकमधील विधानाबाबतची ध्वनिचित्रफीतदेखील तपासली जाणार आहे.
संभाजी भिडे यांची रविवारी वडांगळीकर मठात सभा झाली. तेव्हा त्यांनी उपरोक्त विधान केले. त्याबाबत तक्रार केल्यानंतर पुणे येथील आरोग्य सेवा संचालकांनी चौकशी करून कार्यवाही करण्याची व अहवाल देण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत कायदेशीर नोटीसच बजावली जाणार आहे. भिडे यांच्या दाव्यातील सत्यता पडताळल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव गर्भजल परीक्षा प्रतिबंधक समितीसमोर ठेवण्यात येणार असून, ही समितीच भिडे यांचे उत्तर आणि पुरावे याबाबत तपासणी करून योग्य तो निर्णय घेईल, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

विस्थापितांना मिळणार महापालिकेची सदनिका
कोरेगाव भीमा दंगलीत बेघर झालेल्या दोन कुटुंबांचे पुनर्वसन महापालिकेच्या मालकीच्या सदनिकांमध्ये करण्यात आले. अशोक आठवले व सुरेश सकट अशी सदनिका मिळालेल्यांची नावे आहेत. ही दोन्ही कुटुंबे १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून बसली होती.
पालिकेच्या चाळ विभागाकडील कसबा पेठेतील कॉलनी क्रमांक ५ मधील दोन सदनिका या कुटुंबाना देण्यात आल्या आहेत. त्या ११ महिन्यांकरिता असून, त्यांच्याकडून प्रति महिना १ रूपया भाडे आकारले जाणार आहे.


 

Web Title: Elgher's leaders are arrested for the Emergency, Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.