परळीत पाण्याअभावी वीजनिर्मिती ठप्प!

By admin | Published: July 29, 2014 02:39 AM2014-07-29T02:39:52+5:302014-07-29T02:39:52+5:30

एकीकडे कोळशाचा तुटवडा जाणवत असतानाच दुसरीकडे पाण्याचाही ठणठणाट सुरू झाल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी दोन संच ठप्प आहेत

Electricity jam due to water in Parli! | परळीत पाण्याअभावी वीजनिर्मिती ठप्प!

परळीत पाण्याअभावी वीजनिर्मिती ठप्प!

Next

परळी (जि.बीड) : एकीकडे कोळशाचा तुटवडा जाणवत असतानाच दुसरीकडे पाण्याचाही ठणठणाट सुरू झाल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी दोन संच ठप्प आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत उर्वरित तिन्ही संच पाण्याअभावी बंद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
या केंद्रात एकूण पाच संच असून, प्रत्येक संचाला दररोज १८ हजार घनमीटर पाणी लागते. यातील तीन नंबर २१० मेगावॅट क्षेमतेचा संच पाण्याअभावी फेब्रुवारी २०१३पासून बंद आहे. चार नंबरचा २१० मेगावॅट क्षमतेच्या संचातून कोळसा नसल्याने वीजनिर्मिती होत नाही़ तर २१० मॅगावॅट क्षमतेचा संच पाच, २५० मेगावॅट क्षमतेचे संच सहा आणि सात या तिन्ही संचांमधून सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास एकूण ५८१ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू होती़ मात्र, पाणीच नसल्याने मध्यरात्री १२ वाजेदरम्यान हे तिन्ही संच बंद पडतील, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Electricity jam due to water in Parli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.