शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही, सामनातील टीकेवर एकनाथ खडसेंचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 11:58 AM2018-01-31T11:58:51+5:302018-01-31T12:00:32+5:30

शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही.

eknath khadase's answer on shivsena critisism | शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही, सामनातील टीकेवर एकनाथ खडसेंचं उत्तर

शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही, सामनातील टीकेवर एकनाथ खडसेंचं उत्तर

Next

मुंबई-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सामना संपादकीयमधून टीका केली होती. एकनाथ खडसे त्यांच्या कर्माची फळं भोगत असल्याची बोचरी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आली होती. या टीकेला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही, असं कडव उत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं. शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही. शिवसेना सत्तेत बसून भाजपा व सरकारवर टीका करते. म्हणूनच शिवसेनेनं आधी सत्तेतून बाहेर पडावं, मगच टीका करावी असा सल्लाही एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला दिला आहे. 

मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना ‘खतम’ करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा, मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. ते कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या शेजेवर चढून जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असं त्यांना वाटत असलं तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरलं आहे काय? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचं असतं. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना ‘खुली’ ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच.'', अशा शब्दांत सामनातून एकनाथ खडसेंवर टीका करण्यात आली आहे.  
 

Web Title: eknath khadase's answer on shivsena critisism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.