अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:12 AM2018-01-30T05:12:58+5:302018-01-30T05:13:14+5:30

दोंडाई येथे उभारण्यात येणाºया वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक २९१/२ अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली आहे. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला.

 Due to the low cost, Patil was desperate, got only 4 lakh for five acres of land | अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले

अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले

Next

धुळे : दोंडाई येथे उभारण्यात येणाºया वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक २९१/२ अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली आहे. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला. तर त्यांच्या शेजारी असलेल्या शेतमालकास गुंठाभर जमिनीसाठी एक कोटी ८९ लाखांचा मोबदला मिळाला.
जमीन संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज प्रकल्पाला विखरणचे नाव द्यावे, अशी धर्मा पाटील यांची इच्छा होती. परंतु तसे झाले नाही. विखरण शिवारात लावलेल्या प्रकल्पावर महाराष्टÑ राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित दोंडाईचा सौर ऊर्जा पार्क व ५०० मेगावॅट अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट, मेथी-विखरण असे नाव देण्यात आले आहे.
मरण आले तरी चालेल....
जमिनीचा अल्प मोबदला मिळाल्याने धर्मा पाटील यांनी प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. ‘मरण आले तरी चालेल, परंतु न्याय मिळायला हवा’ असे ते नेहमी म्हणत असत. धर्मा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर गेल्या दोन ते तीन दिवसात विखरण येथे राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. हेमंत देशमुख, बाळासाहेब थोरात व इतर राजकीय क्षेत्रातील मंडळींनी भेटी दिल्या.
त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. परंतु आता धर्मा पाटील यांचाच मृत्यू झाल्याने कुटुंबापुढे मोठे संकटच उभे राहिले आहे. धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच विखरण गावावर शोककळा पसरली.

औष्णिक प्रकल्पाऐवजी सौर प्रकल्प
१० सप्टेंबर २००९ रोजी शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात औष्णिक वीज प्रकल्पासाठी शिंदखेडा तालुक्यातील विखरण, मेथी, कामपूर, वरझडी येथील जमीन संपादित करण्यात येणार होती. परंतु, २०१७ साली औष्णिक प्रकल्पाऐवजी सौर प्रकल्प करण्याचे निश्चित झाले. यासाठी विदेशी कंपन्यांचे प्रतिनिधीही येथे पाहणी करून गेले होते. सौर प्रकल्पासाठी केवळ विखरण व मेथी या गावशिवारातील शेतजमिनींचे संपादन करण्याचे ठरले.

भूसंपादन आघाडीच्या काळात : रावल

धर्मा पाटील यांच्या जमिनीचे संपादन आघाडी सरकारच्या काळात झाल्याची बाब समोर आली आहे. २०१४ मध्ये हे संपादन झाले आणि त्याचा मोबदला म्हणून २ लाख १८ हजार रुपये इतकी मोबदल्याची रक्कम पाटील यांनी स्वीकारली होती. तसेच भूसंपादनाचे दर आघाडी सरकराच्या काळातच ठरले होते. आपण या बाबत तेव्हा विरोधी पक्षात असताना विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या बाबतचे उत्तर दिले होते, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकारांना सांगितले.

जमिनीचे
३० दिवसांत फेरमूल्यांकन, 
व्याजासह मोबदला देऊ
- ऊर्जामंत्री बावनकुळे


नागपूर : मौजे विखरण (देवाचे) जिल्हा धुळे येथील सौर ऊर्जा (पूर्वीचा औष्णिक ऊर्जा) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या मोबदल्यासंदर्भात धर्मा पाटील यांना कमी मोबदला मिळाला असेल तर सरकारने संपादित केलेल्या सर्व जमिनीचे फेरमुल्यांकन ३० दिवसांच्या आत पूर्ण करून नियमानुसार व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शेतीमधील फळझाडांचे मूल्यांकन व शेती क्षेत्रफळानुसार मोबदला मिळाला नाही. यासंदर्भात १ आॅक्टोबर २०१२ च्या पंचनाम्याची तपासणी करून नियमानुसार जे मूल्यांकन येईल त्या मूल्यांकनावर व्याजासहित जो मोबदला येईल तो देण्याबाबत ३० दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
 

Web Title:  Due to the low cost, Patil was desperate, got only 4 lakh for five acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.