इथे पिण्यासाठी पाणी मिळेना अन लगीनघाई शौचालय बांधण्याची?

By Admin | Published: March 6, 2017 03:27 AM2017-03-06T03:27:28+5:302017-03-06T03:27:28+5:30

जिल्ह्यात सर्वत्र प्रशासनाने हगणदारी मुक्तीचा विडा उचलला असून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय बांधण्याची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.

Drink water for unhygienic toilet? | इथे पिण्यासाठी पाणी मिळेना अन लगीनघाई शौचालय बांधण्याची?

इथे पिण्यासाठी पाणी मिळेना अन लगीनघाई शौचालय बांधण्याची?

googlenewsNext

रविंद्र साळवे,
मोखाडा- मोखाड्यासह जिल्ह्यात सर्वत्र प्रशासनाने हगणदारी मुक्तीचा विडा उचलला असून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय बांधण्याची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.
जिल्हा प्रशासनाने सुद्धा सक्त आदेश दिले असून सर्वच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामपंचयतीला मिटिंगा घेऊन शौचालय बांधण्यास सक्ती करत आहेत परंतु दरवर्षीच मोखाडा तालुका भीषण पाणी टंचाईने होरपळत असताना पिण्यासाठी पाणी नाही त्यात शौचालयासाठी पाणी कुठून आणायचे असा सवाल आदिवासी बांधव प्रशासनाला विचारत आहेत.यामुळे योजना राबविताना प्रशासनाने फक्त देखावा करून चालणार नाही तर त्यासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचं आहे मोखाडा तालुक्यात २७ ग्रामपंचायती असून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय बांधण्याचे काम सुरु आहे १२ हजाराचे अनुदान मिळत असल्याने लाभार्थी सुद्धा समाधानी आहे असे असले तरी शौचालयासाठी मुबलक पाणी गरजेचं आहे परंतु मोखाडयात भीषण पाणी टंचाईची दाहकता भोगणाऱ्या आदिवासीना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे मोखाड्यातील टँकरने पाणी पुरवठा करण्याचे १३ प्रस्ताव पडून आहेत २४ तासात प्रस्तावाला मंजुरी देण्याचे धोरण असतांना देखील जिल्हाधिकारी साहेब झोपेतच आहेत यामुळे शौचालय बांधण्याची सक्ती करणाऱ्या प्रशासनाने प्रथमता पाण्याची व्यवस्था करणे गरजेचं आहे अन्यथा शासनाची महत्वकांक्षी स्वच्छ भारत अभियानाची योजना नेहमीच्या योजना प्रमाणे बासनात गुंडाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
>स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महिलांनी शौचालयात जावे ही प्रशासनाची संकल्पना योग्य आहे. परंतु यासाठी प्रथमता प्रशासनाने पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा ही योजना राबविली तरी यशस्वी होणार नाही इथे प्यायला पाणी नाही आणि शौचालयासाठी पाणी कुठून आणणार? याचा विचार प्रशासनाने आधी करावा.
- प्रकाश निकम,
जिल्हा परिषद सदस्य पालघर

Web Title: Drink water for unhygienic toilet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.