आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिलीप म्हैसेकर

By Admin | Published: February 8, 2016 04:09 AM2016-02-08T04:09:16+5:302016-02-08T04:09:16+5:30

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Dilip Mhasekar, Vice Chancellor of the University of Health Sciences | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिलीप म्हैसेकर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिलीप म्हैसेकर

googlenewsNext

मुंबई : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल आणि कुलपती चे. विद्यासागर राव यांनी, रविवारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर, डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा केली. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी आहे.
डॉ. अरुण जामकर यांचा कार्यकाळ २० डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. एकनाथ डवळे प्रभारी कुलगुरू म्हणून या पदाचा कार्यभार सांभाळीत होते. राज्यपालांनी कुलगुरू निवडीसाठी दिल्लीच्या एम्स येथील प्रो. डॉ. निखिल टंडन यांच्या अध्यक्षतेखाली शोधसमिती गठीत केली होती. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती रविवारी राजभवन येथे झाल्या. त्यानंतर डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.डॉ. दिलीप म्हैसेकर (जन्म १२ जुलै १९६०) यांनी १९८४ साली औरंगाबादच्या
शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली, तर १९८९ साली मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून (क्षयरोग व छातीचे विकार) या विषयात एमडी केले. म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव असून, त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत. सध्या ते नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालचे प्रभारी अधिष्ठाता, तसेच पल्मोनरी मेडिसिन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

Web Title: Dilip Mhasekar, Vice Chancellor of the University of Health Sciences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.