dhule Municipal Election updates: धुळ्यात पैसे वाटपाच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 10:21 AM2018-12-10T10:21:04+5:302018-12-10T10:22:17+5:30

धुळे/अहमदनगर : महापालिका निवडणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या ...

dhule municipal election updates: money distribution complaints in Dhule | dhule Municipal Election updates: धुळ्यात पैसे वाटपाच्या तक्रारी

dhule Municipal Election updates: धुळ्यात पैसे वाटपाच्या तक्रारी

Next

धुळे/अहमदनगर : महापालिका निवडणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी दोन्ही ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरुवात होऊन दुपारी बारानंतर निकाल हाती लागण्यास सुरुवात होईल. धुळ्यात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप विविध पक्षांनी केला़. नगर व धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहील, अशी शक्यता आहे.

धुळ्यात दुपारी ४ वाजेनंतर साक्री रोडवरील मोगलाई परिसरातील एका घरात पैसेवाटप होत असल्याची माहिती मिळाल्याने आमदार अनिल गोटे यांनी त्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तातडीने पोलीस, भरारी पथके दाखल झाली. काही वेळाने त्यांनी आंदोलन मागे घेतले. तर काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी गोंदूर रोडवरील एस. आर.  पाटील शाळा येथील मतदान केंद्राच्या परिसरात पैसे वाटप होत असल्याची तक्रार महापालिका व पोलीस प्रशासनाकडे केली.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व त्यांचे चिरंजीव डॉ. राहुल भामरे, अनिल गोटे व त्यांच्या पत्नी हेमा गोटे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले आदींनी मतदान केले. धुळ्यात ७४ (१ बिनविरोध) जागांसाठी तर ६८ जागांसाठी मतदान झाले.
नगरला एकाला अटक
नगरला तारकपूर भागातील सेंट विवेकानंद हायस्कूलमध्ये पैसे वाटप करताना विशेष पथकाने आकाश औटी या युवकाला अटक केली. मतदान केंद्रावर मोबाईल बाळगल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पत्रकार संदीप रोडे यांना पोलीस निरीक्षकांनी मारहाण केली. बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली. राजकीय वादातून शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
>छिंदमच्या भावाने केली मतदान यंत्राची पूजा
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम नगर महापालिका निवडणुकीत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मतदानाच्या दिवशी छिंदमच्या भावाने रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १५८ मध्ये जाऊन चक्क ईव्हीएम मशीनची पूजा केली. याबाबत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.
>नगरमध्ये बाजी कोण मारणार?
‘लोकमत’ने केलेल्या एका पाहणीनुसार भाजपा (१८ ते २०), शिवसेना (१९ ते २१), राष्ट्रवादी (२१ ते २३), काँग्रेस (३ ते ४), इतर (३ ते ४) अशी स्थिती राहील. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते.

Web Title: dhule municipal election updates: money distribution complaints in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.