महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असणार? "संख्याबळ तर आमचंच जास्त असेल, पुढचा मुख्यमंत्री..."; फडणवीस यांचं ठाम उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 09:22 PM2024-02-15T21:22:59+5:302024-02-15T21:23:56+5:30

Lokmat Maharashtrian of the year awards 2024: "...पण अल्टिमेटली आम्ही तिघेही याचा निर्णय करू आणि यात मोठा रोल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल."

Devendra Fadnavis, Eknath Shinde or Ajit Dada Who will be the next CM of Maharashtra The Deputy Chief Minister said clearly | महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असणार? "संख्याबळ तर आमचंच जास्त असेल, पुढचा मुख्यमंत्री..."; फडणवीस यांचं ठाम उत्तर

महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असणार? "संख्याबळ तर आमचंच जास्त असेल, पुढचा मुख्यमंत्री..."; फडणवीस यांचं ठाम उत्तर

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखला जाणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळा पार पडला. येथील गट वे ऑफ इंडिया येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' घेण्यात आली. यावेळी त्यांनी सर्वच प्रश्नांना मोकळ्या मनाने आणि स्पष्ट शब्दात उत्तरं दिली. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री नोमका कोण असेल? यावरही त्यांनी भाष्य केले. लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाकत घतेली.

यावेळी, आपले प्रदेशाध्यक्ष अथवा भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार म्हणून सांगत आहेत, एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगत आहेत, तर अजित पवारांचे सर्व नेते आणि कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात. हे सर्व संख्या बळावर ठरेल वैगेरे असे जरी असले, तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न विचारला असता, "महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

यावर, ज्याचे संख्याबळ जास्त तो? असे विचारले असता, फडणवीस म्हणाले, "आम्ही असे संख्याबळ वैगेरे काही ठरवलेले नाही. संख्याबळ तर आमचेच अधिक असणार आहे. याबद्दल कुणाच्याही मनात कसलीही शंका नाही. मात्र केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील. शेवटी कार्यकर्त्यांचे मोटीवेश काय असते, तर माझा नेता मोठा झाला पाहीजे हे मोटीवेशन असते."

"जेव्हा आमचे नेते म्हणतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहीजे, तेव्हा आमच्या लोकांना आनंद वाटतो. तसेच एकनाथराव शिंदे यांचे शिवसेनेचे लोक आहेत, त्यांच्या जवळ जर खूप भाषण करून सांगितलं की आपल्याला अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंमंत्री करायचे आहे, तर टाळ्या वाजवतील पण तुलनेने कमी वाजवतील ना. तो उत्साह येणार नाही. शेवटी त्यांच्या पक्षाच्या लोकांनाही हेच वाटतं, की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री कायला हवे आणि अजित दादांच्या पक्षातील कार्यकरत्यांना वाटतं की, दादांना करायला हवे. पण अल्टिमेटली आम्ही तिघेही याचा निर्णय करू आणि यात मोठा रोल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल," असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Devendra Fadnavis, Eknath Shinde or Ajit Dada Who will be the next CM of Maharashtra The Deputy Chief Minister said clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.