राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:10 AM2019-06-06T03:10:37+5:302019-06-06T03:10:55+5:30

विदर्भ-मराठवाड्यात हजेरी; पत्रे उडाले, झाडे कोसळली, फळबागा झोपल्या

Damage due to rain in the state before monsoon | राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसान

राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसान

Next

नांदेड/अहमदनगर : विदर्भ-मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाने घरावरचे पत्रे उडून गेले असून झाडेही उन्मळून पडली. फळबागा झोपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उमरी (जि़ नांदेड) येथे मंगळवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. अनेकांचे हातगाडे व त्यावरील साहित्य नाहीसे झाले. शहरात अनेक घरांवरील पत्रे उडाली. वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले.

उमरी रेल्वे स्थानकातील व बसस्थानकाचे छत उडाले. तसेच छताचे पंखे मोडून खाली पडले. पिंपळाचे एक झाड उन्मळून खाली पडले. वाºयाचा दाब एवढा मोठा होता की, शहरात अनेक घरावरील पाण्याच्या टाक्या उडून गेल्या. तसेच सोलारचे पॅनल उडून गेले. तळेगाव व परिसरात विजेचे खांब पडल्याने नुकसान झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चार जनावरे दगावली
अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील हळगाव व आघी गावांमध्ये वादळी, पावसामुळे चारा छावण्यांमधील जनावरांचे छप्पर उडून गेले. वीज पडून दोन बैल व दोन गायींचा मृत्यू झाला. आघी येथील पाच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले.

केळी बागांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री वादळी वाºयांसह झालेल्या पावसामुळे पाथरी, मानवत व जिंतूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे़ पाथरी तालुक्यातील लिंबा, विटा बु़, बाबूलतार या गावांमध्ये घरांवरील पत्रे उडून गेले़

Web Title: Damage due to rain in the state before monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.