Dalit community, younger brother, all together, Chhatrapati Sambhaji Maharaj appealed to peace | दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे, छत्रपती संभाजीराजेंनी केलं शांततेचं आवाहन

नवी दिल्ली- भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव घटनेमुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला शांततेने राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘मराठा समाजाला मी एवढंच सागेंन की, आपण मोठा भाऊ आहोत आणि दलित समाज आपला धाकटा भाऊ आहे. त्यामुळे बहुजन समाजाला एकत्र घेऊन आपल्याला नांदायचं आहे.’ असं म्हणत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. 

शिवाजी महाराज, शाहु-फुले-आंबेडकर यांच्या भूमीत ही घटना घडणं दुर्दैव आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा 'काळा दिवस' आहे.भीमा-कोरेगावची घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच निंदनीय आहे.  आपण संयम पाळला पाहिजे.’ असंही संभाजीराजे यांनी यावेळी म्हंटलं. ‘जे समाजाला विघातक मार्गाला लावण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. मग ते कोणीही असू दे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण पुन्हा महाराष्ट्रात आम्हाला हा दिवस पाहायचा नाही, असंही संभाजीराजे यांनी म्हंटलं आहे
मराठा समाजाला मी एवढंच सागेंन की, आपण मोठा भाऊ आहोत आणि दलित समाज आपला धाकटा भाऊ आहे. बहुजन समाजाल एकत्र घेऊन आपल्याला नांदायचं आहे.’ असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.