अंधेरी स्टेशनमध्ये या क्रिकेटरनं घुसवली कार

By admin | Published: February 20, 2017 10:30 AM2017-02-20T10:30:36+5:302017-02-20T13:00:20+5:30

अंधेरी रेल्वे स्टेशनमध्ये एका तरुणानं कार घुसवल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

The cricketer entered the Andheri station | अंधेरी स्टेशनमध्ये या क्रिकेटरनं घुसवली कार

अंधेरी स्टेशनमध्ये या क्रिकेटरनं घुसवली कार

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - अंधेरी रेल्वे स्टेशनमध्ये एका तरुणानं कार घुसवल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी सकाळी 7.30 वाजताची ही घटना आहे. हरमित सिंग नावाच्या तरुणाने भरधाव कार चालवत अंधेरी रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घुसवली. 
 
दरम्यान, हरमित सिंग हा अंडर 19 इंडियन क्रिकेट टीममधील खेळाडू असल्याची माहिती समोर आली आहे. 
रेल्वे स्टेशनवर कार घुसवल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या  घटनेची चौकशी सुरू आहे. 
 
अंधेरी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. त्यात गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर अचानक कार घुसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र वेळीच हरमित सिंगनं कारवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. 
 
 
 

Web Title: The cricketer entered the Andheri station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.