शिवसेना ठाकरे गट-वंचित युतीवर काँग्रेसची सावध भूमिका; "आधीचे अनुभव वाईट त्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 04:23 PM2023-01-23T16:23:57+5:302023-01-23T16:25:16+5:30

उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालीय. प्रकाश आंबेडकरांचा नेमका प्रस्ताव काय हे तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटलं अशी माहिती पटोलेंनी दिली.

Congress Nana Patole cautious stance on Shiv Sena Uddhav Thackeray group and Vanchit Bahujan Aaghadi alliance | शिवसेना ठाकरे गट-वंचित युतीवर काँग्रेसची सावध भूमिका; "आधीचे अनुभव वाईट त्यामुळे..."

शिवसेना ठाकरे गट-वंचित युतीवर काँग्रेसची सावध भूमिका; "आधीचे अनुभव वाईट त्यामुळे..."

Next

पुणे - शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली त्याला विरोध करण्याचं कारण नाही. त्यांचे स्वागत आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा. तर अद्याप प्रकाश आंबेडकरांकडून मविआला कुठलाही प्रस्ताव नाही. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालीय. प्रस्ताव आल्यानंतर आंबेडकरांचे म्हणणे काय त्यावर चर्चा करू. आमची भूमिका सकारात्मक आहे. विरोधात नाही. भाजपाला थांबवणे हे आमचं काम आहे. लहान-मोठ्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेसची आहे. काही अनुभव मागचे आहेत त्यामुळे आम्ही ताकही फुकून पितोय. दोस्तीचा हात पुढे केला तर तो पूर्णच करायची ही भूमिका काँग्रेसची आहे अशी सावध प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 

नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालीय. प्रकाश आंबेडकरांचा नेमका प्रस्ताव काय हे तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटलं. त्याच्यानंतरच या विषयाबाबत पुढे जाऊ. चर्चा झाली परंतु प्रस्ताव नेमका काय यावर बोलणं नाही. मैत्री करायची असेल तर सगळ्या विषयात स्पष्टता हवी. मीडियाने काय दाखवावे हा त्यांचा प्रश्न आहे. जागावाटपाबाबत प्रस्ताव आल्यावर चर्चा करू. भाजपाला सत्तेतून दूर करणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तेच काम राहुल गांधी करतायेत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचेय. फायदा-तोटा हा भाग नाही. सगळ्यांना एकत्रित आणणे हे आमचे धोरण आहे. मागचे काही अनुभव फार वाईट आहेत. त्यामुळे स्पष्टता असल्यावरच पुढे जाता येईल असं त्यांनी स्पष्ट केले. 

कसबा पोटनिवडणूक लढवण्याची तयारी
बिनविरोध निवडणुका व्हाव्यात ही महाराष्ट्राची परंपरा होती. पण जेव्हा राज्यात सत्तापरिवर्तन झाले. त्यात पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेतला तेव्हा भाजपाने त्याठिकाणी उमेदवार उभे केले होते. कसबा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झाला नाही. आमच्याकडे भाजपाचा प्रस्ताव नाही. इच्छुक उमेदवार यांच्याशी गाठीभेटी सुरू आहे. निवडणूक लढवण्याची तयारी आहे. अनेक नेते इच्छुक आहेत. कसबा जागा काँग्रेस लढेल आणि चिंचवड जागा राष्ट्रवादी लढेल असं चित्र आहे. मविआत चर्चा झालीय. त्यामुळे काही अडचण नाही. २-३ तारखेला आमची भूमिका समोर येईल असंही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Congress Nana Patole cautious stance on Shiv Sena Uddhav Thackeray group and Vanchit Bahujan Aaghadi alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.