काँग्रेसचा चार, भाजपाचा तीन पालिकांवर कब्जा!

By admin | Published: July 23, 2014 03:16 AM2014-07-23T03:16:11+5:302014-07-23T03:16:11+5:30

चिखलदरा वगळता जिल्ह्यातील दहापैकी नऊ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Congress four, BJP occupy three parties! | काँग्रेसचा चार, भाजपाचा तीन पालिकांवर कब्जा!

काँग्रेसचा चार, भाजपाचा तीन पालिकांवर कब्जा!

Next
अमरावती/वर्धा : चिखलदरा वगळता जिल्ह्यातील दहापैकी नऊ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दोन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणुकीवर स्थगनादेश असून, चार नगराध्यक्षांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. 
उर्वरित अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे व शेंदुरजनाघाट पालिकेत नगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. 
वर्धा जिल्ह्यात सहा पालिकांच्या निवडणुकीत भाजपा व काँग्रेसचा प्रत्येकी दोन पालिकांवर ङोंडा फडकला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका पालिकेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीला जबर हादरा देत हिंगणघाट पालिकेवर अपक्षांनी बाजी मारली. 
या दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेसने चार आणि भाजपाने तीन पालिकांवर कब्जा केला आह़े
तसेच भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि अपक्ष अशी अभद्र युती असलेल्या वर्धा नगरपालिकेत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या त्रिवेणी कुत्तरमारे यांनी बाजी मारली़ काँग्रेसच्या 13पैकी 9 सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने उमेदवार वर्षा खैरकार यांना केवळ चारच मते मिळाली़  (प्रतिनिधी)
 
सून अध्यक्ष तर
सासरा उपाध्यक्ष
वर्धेतील सिंदी (रेल्वे) नगरपालिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सुनीता कलोडे (काँग्रेस) या उपाध्यक्ष अशोक कलोडे यांची स्नुषा आहेत. दोघेही निवडून आल्याने या पालिकेवर सून आणि सास:याची सत्ता आली हे विशेष. अशोक कलोडे हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत.

 

Web Title: Congress four, BJP occupy three parties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.